हीच ती वचपा काढण्याची वेळ बेसावध राहू नका -मनसे अध्यक्ष राज ठाकरे

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त आज पहिल्यांदाच पॉडकोस्टवरून जनतेशी संवाद साधला . यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले आम्ही फक्त आपट्याची पाने एकमेकांना वाटत असून महाराष्ट्रच सोन गेलं अनेक वर्षांपासून लुटलं जात आहे.आम्ही कधी स्वताच्या आयुष्यात मश्गूल तर कधी जाती-पातीत मश्गूल. आपण लुटारुंकडे(राज्यकर्ते) कधी लक्ष देणार आहोत..? आजचा दसरा मेळावा हा निवडणुकीच्या तोंडावर आहे. त्यामुळे तुम्ही बेसावध राहू नका, असं म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली.महाराष्ट्राची प्रगती कुठं चालली आहे..? असा सवाल करत राज ठाकरे म्हणाले, नुसते रस्ते, पुल बांधून प्रगती होत नसते. प्रगती समाजाची व्हावी लागते. आपण परदेशात गेल्यावर पाहतो, त्याला प्रगती म्हणतात. आपण फक्त चाचपडतोय. एवढं असूनही आपल्याला राग येत नाही, हे विशेष. आपण दरवेळी त्याच-त्याच लोकांना निवडून देतो आणि पश्चातापाचा हात डोक्यावर मारतो. हे आता थांबवा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी क्रांती केली पाहिजे. आजपर्यंत तुम्ही जे सर्व लोकांना निवडून देत आलात. त्यांना तुम्ही जोपासलं आणि सांभाळलं. ते तुमच्या मतांची प्रतारणा करत आलेत. तुम्हाला अत्यंत गृहित धरलं गेलं. वेड्यावाकड्या आघाड्या, युत्या केल्या जातात आणि दरवेळेला हे जे गृहित धरणं आहे हेच महाराष्ट्राराचं नुकसान करत आलं आहे. माझ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकं, शेतकरी, तरुण-तरुणींना माझी हात जोडून विनंती आहे. की या दसऱ्यानंतर येणाऱ्या ज्या निवडणूका आहेत. त्यावेळी बेसावध राहू नका. त्या शमीच्या झाडावरची शस्त्रं आता उतरवा. ही क्रांती आणि वचपा घेण्याची वेळ आहे. आता ही शस्त्र उतरवून या सर्वांचा तुम्हाला वेध घ्यावा लागेल,” असे आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना केले.

![]()











