सखोल तपास करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

नाशिक : तो नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात काही कामानिमित्त आला त्याची ओळख तेथील व्यक्तीशी झाली आणि चक्क तो सावकारी चक्रात अडकला त्याने कर्ज घेतले सव्वा लाखाचे आणि सावकाराने त्याच्या कडून उकळले नऊ लाख रुपये अखेर त्या व्यक्तीने पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दशरथ साबळे (44,रा गंगापूर रोड) हे 2007 सालापासून हॉटेलिंगसाठी जागा भाड्याने देणे, कामगार-वेटर पुरविणे, परवाने काढून देणे ही कामे करायचे. यादरम्यान 2012 साली ते परवानाच्या कामासाठी पोलीस आयुक्तालयात गेले असता त्याठिकाणी त्यांची ओळख सुनील महाजनसोबत झाली. यादरम्यान दशरथ साबळे यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला यासाठी त्यांना पैशांची गरज पडल्याने त्यांनी महाजन यांच्याकडून तीस हजार रुपये 10 टक्के व्याजाने घेतले या रक्केमेपोटी ते महाजन यांना दरमहा तीन हजार रुपये व्याज दयायचे मात्र दशरथ साबळे यांना पुन्हा पैशांची गरज पडल्याने दि 1 ऑगस्टला साबळे यांनी महाजन यांच्याकडून 1 लाख रुपये चेकने घेतले त्यामुळे 1 लाख 30 हजारांवर दरमहा 13 हजार रुपयांचे व्याज साबळे हे महाजनांना देत होते 2020 सालापर्यंत ते नियमित व्याज देत होते. चक्रवाढ व्याजात अडकल्यानंतर पुन्हा कर्ज जुने कर्ज मिटवण्यासाठी फिर्यादी दशरथ साबळे यांनी खाजगी बँकेतून 7 लाख 90 हजारांचे कर्ज घेतले त्यातून संशयीताला एक लाखांचा धनादेश दिला तरीही संशयित पैसे मागत असल्याने फिर्यादी साबळे यांनी दिनांक पाच मार्च रोजी 34 हजार 586 रुपये रोख रकमेसह दोन लाख रुपये व मागील व्याज मिळून एक लाख आणि 35 हजारांचे तीन हप्ते व अधिक 65 हजार 414 रुपये दिले. पुन्हा व्याजापोटी 50 हजार दिले. साबळे यांच्याकडे संशयित दापत्याने 8 लाख रुपये व दरमहा चक्रवाढ व्याजाने 23 हजार 962 रुपयांची मागणी केली. या दरम्यान सुनील महाजन व त्याचे चुलत सासरे दशरथ साबळे यांच्याकडे आले. त्यांनी तुझ्याकडे अद्याप पाच लाख रुपये बाकी असून तुझी शेतजमीन आमच्या नावे कर अशी मागणी केली त्यावर माझ्याकडे शेत जमीन नाही तसेच मी संपूर्ण पैसे व्याजासह परत दिल्याचे साबळे यांनी सांगितले त्यानंतर संशयितांनी साबळे कुटूंबियांना शिवीगाळ केली. महाजन याने ज्या मोबाईल क्रमांकाचा वापर करत साबळे यांना धमक्या दिल्या तो क्रमांक एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर असल्याची माहिती मिळत आहे. अखेर या सर्व प्रकाराला वैतागुन दशरथ साबळे यांनी या छळाची कैफियत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या समोर मांडली. पोलीस आयुक्तांनी लागलीच गंगापूर पोलिसांना गुन्हा दाखल करून संशयीताला ताब्यात घेण्याचे फर्मान सोडले. साबळे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित सुनील महाजन हा पोलीस असल्याचा संशय फिर्यादी साबळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत

![]()











