प्रेमिका असलेल्या शिक्षिकेने काढला काटा, पाच तासात पोलिसांनी आरोपी केले गजाआड

नाशिक : काल सकाळी 7 वाजेच्या सुमारास मेरी वसाहत परिसरात सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे (24,राधेश्याम निवास म्हसरूळ ) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता .पहाटेच्या सुमारास जॉगिंग करणाऱ्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मूर्तदेह दिसून आल्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, ज्योती आमणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर तातडीने गुन्हे शाखा युनिट -1 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करून तपासाला सुरवात करण्यात असता अवघ्या पाच तासात पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या. दरम्यान शिक्षिका असलेली गगन कोकाटे याची प्रेमिका संशयित भावना सुशांत कदम (39,रा म्हसरूळ) हिने गगणच्या खुनाची सुपारी देऊन काटा काढला अशी माहिती पोलिसांनी दिली असून या खुनाच्या गुन्ह्यात संकेत शशिकांत रणदिवे (20) महेफुज रशीद सय्यद (20) रितेश दिलीप सपकाळे (20 सर्व रा सातपूर) व गौतम सुनील दुसाने (18 रा. गंगापूर रोड) आदींना बेड्या ठोकण्यात आल्या . मिळालेल्या माहितीनुसार गगन कोकाटे याच्या घराशेजारी राहणारी भावना कदम हिच्यासोबत त्याची ओळख होऊन नंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले होते सुमारे चार ते पाच वर्षांपासून या दोघांचे अनैतिक संबंध होते. त्यानंतर या दोघांमध्ये अजून एकाची एन्ट्री झाली यामुळे दोघांमध्ये खटके उडू लागले. गगन तिला वारंवार त्रास देत असल्याचा राग तिच्या मनात होता. अखेर तिने गगनला संपविण्याचा कट रचला .भावना ही एका खाजगी रात्र शाळेत तात्पुरती शिक्षिका म्हणून नोकरीला होती. अखेर कुठलाही विचार न करता गगनला संपविण्यासाठी तिने संकेत या तरुणाला 2 लाख रुपयांची सुपारी दिली यावेळी तिने एका माजी विद्यार्थीच्या मदतीने संकेतसोबत ओळख करून घेतली होती. संकेत याने 1 लाख रुपये ऍडव्हान्स घेतले व काम झाल्यानंतर 1 लाख रुपये देण्याचे ठरले. दोन लाख रुपयांची सुपारी घेत खून करणाऱ्या सहा जणांच्या टोळीच्या वाट्याला प्रत्येकी 30 हजार रुपये येणार होते. दुचाकीने हे सहा जण मेरी वसाहतीमागे अंधारात दबा धरून बसले. यादरम्यान मेरी वसाहतीमागे गगन व भावना यांचा भेटण्याचा कायमचा स्पॉट ठरलेला होता तिने रात्री भेटण्यासाठी गगनला त्या ठिकाणी बोलावून घेतले आधीच संशयित त्याठिकाणी दबा धरून बसलेले होते. यावेळी भावना व गगनमध्ये वाद झाला यावेळी हल्लेखोर बाहेर येत म्हणाले काय रे मुलीची छेड काढतो का असे म्हणत गगनला घेरत त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला चढवून सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडताच या सर्वांनी तेथून पळ काढला. घटनास्थळी पोलिसांना मयताच्या अंगावरील कपड्यांच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली होती. त्यानंतर या तपासाला गती मिळाली अवघ्या पाच तासात पोलिसांनी हल्लेखोरांनच्या मुसक्या बांधल्या. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रवीण कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, गजानन इंगळे, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नाझीमखान पठाण आदींच्या पथकाने केली. अखेर तो घरी आलाच नाही – मंगळवारी गगन हा मोठ्या भावाच्या कॉलेज रोडवरील कॅफे घरी जातो, असे सांगून निघाला मात्र तो रात्री घरी गेलाच नाही त्यामुळे रात्रभर त्याचे वडील व भाऊ शोधत होते. गगन हा एका सनदी लेखापालच्या कार्यालयात नोकरीला होता.
![]()











