• Latest
  • Trending

फक्त बदल्या करून गुन्हेगारी आटोक्यात येईल का ?

July 20, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

फक्त बदल्या करून गुन्हेगारी आटोक्यात येईल का ?

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

पोलिसांना रस्त्यावर उतरून धाक निर्माण करावाच लागेल

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून एका महिन्यातच नाशिक शहरात तीन खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिन्यात एका रिक्षाचालकाचा निर्घृण खून करण्यात आला त्यानंतर गंजमाळ परिसरात घरात घुसून भावासमोरच भावाचा खून करण्यात आला मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीचा खून झाला तो व्यक्ती सराईत गुन्हेगार व नाशिक शहरातून तडीपार होता. तर आताच म्हसरूळ परिसरात एका वृद्ध महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार शेजारी राहणाऱ्या सराईत गुन्हेगारानेच हे कृत्य केले मात्र तो सराईत गुन्हेगार अजून देखील पोलिसांच्या हाती लागला नाही. तर दुसरीकडे भाईगिरी देखील मोठ्याप्रमाणात वाढली सिडको परिसरात तर लोकप्रतिनिधीच्या मुलावरच टोळक्याने शस्त्र उगारली होती. नाशिकरोड परिसरात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना डीजेचा आवाज कमी करा सांगितल्याचा राग येऊन माजी नगरसेविकेच्या पतीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. तर टाकळी रोड परिसरात एका लग्नाला उपस्थिती लावून माजी नगरसेवक आपल्या गाडीतुन घरी जात असताना दोघा-तिघांनी वाद करत गाडी थांबवत मारहाण करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही त्या ठिकाणी सामान्य नागरिकांचे काय ? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. मुख्य म्हणजे काही तरुण सरळ हातात कोयता, चॉपर सारखे हत्यारे मिरवण्यात धन्यता मानू लागले आहेत .काही वर्षांपूर्वी नाशिक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असताना तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी आपली पूर्ण टीमच नाशिकच्या रस्त्यांवर उतरवली होती यामध्ये पोलीस उपायुक्त डॉ स्वामी, सहायक पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, हेमराजसिंग राजपुत यांनी गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण केली होती. रात्री -भल्यापहाटे प्रत्येक झोपटपट्टीत कोंबिंग ऑपरेशन राबवत लपून बसलेल्या तडीपार गुंडांना बाहेर काढून जेल मध्ये टाकले होते यादरम्यान गुंड या टीमला थरथर घाबरत असत काही गुंडांनी पोलिसांची दहशत घेत नाशिक सोडणे पसंत केले होते .मुख्य म्हणजे या टीमने “एसी” तुन बाहेर येत रस्तानरस्ता पिंजून काढला होता त्यामुळे गुन्हेगारांना नाशिक सोडून पळ काढावा लागला होता. आणि आज पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढण्यास सुरवात केली असून खुनाच्या घटनांबरोबरच वाहन चोरी, जबरी घरफोडी, वाहनांची जाळपोळ ,वाहनांची तोडफोड या घटना वाढल्या असून जुन्या नाशकात देखील वाहन जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या तर उपनगर व सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत काही दिवसांपूर्वी बजरंगवाडी परिसरात दोन गटात तुफान राडा झाला होता यावेळी घातक शस्त्र वापरली गेली व सामान्य नागरिकांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. यामुळे पोलिसांवरच चौफेर टीका होत असून शहरात नेमके राज्य खाकीचे की गुंडांचे असा प्रश्न विचारला जाऊ लागला असतानाच आज पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ऍक्शन मोड मध्ये आलेले दिसले. वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी त्यांनी शहरातील तब्बल 25 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये नुकतेच बदली होऊन नाशिक आयुक्तालयात दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकांनाही संधी देण्यात आलेली दिसते मात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नाशिक शहरातील गुन्हेगारी आटोक्यात येणार आहे का ? असा प्रश्न देखील सामान्य नागरिकांकडून विचारला जात असून यासाठी खाकीला रस्त्यावर उतरून आपला वचक निर्माण करावा लागणार आहे. त्याशिवाय सध्या रीलच्या आभासी जगात राहणाऱ्या व डोक्यात भाईगिरीच खूळ घुसलेल्या हातात खुलेआम शस्त्र, लाठ्या-काठ्या, दंडुके घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीन तरुण घाबरणार नाहीत मात्र नागरिकांनादेखील पोलिसांना सहकार्य करावे लागेल अन्यथा घडलेल्या घटनेचे मोबाईल मध्ये फोटो काढायचे आणि व्हायरल करायचे. असे करून चालणार नाही अन्यथा गुन्हेगारी वाढतच जाणार कारण आपली वाटचाल आता मोठे शहर असलेल्या मुंबई, पुण्याच्या दिशेने कधीच सुरू झाली आहे…..

Loading

Previous Post

जगभरात खळबळ, मायक्रोसॉफ्ट सर्व्हर ठप्प…..

Next Post

नाशकात गुन्हेगारांचे मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White