माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची समजूत काढण्यात वरिष्ठांना आले अपयश

नाशिक:अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असतानाच भाजप च्या गोटात राजकीय हालचालींना मोठा वेग आला होता. अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला सुरुवात केल्या नंतर नविन नाशिक मध्ये मोठी घडामोड घडली असून भाजपच्या उमेदवार हर्षा सुधाकर बडगुजर यांनी प्रभाग क्र. २५ मधून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपवर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठविली होती. त्यानंतर स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी हा प्रकार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कानावर घातला होता. त्यानंतर हा हा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहोचल्याचे समजते. आज सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांनी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 29 मधून माघार घेतली. त्यामुळे या ठिकाणी आता भाजप पुरस्कृत माझी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे या उमेदवार असणार आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग 25 मधून सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांनी माघार घेतली असून आता ते प्रभाग 29 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहे या प्रभागातून अधिकृत उमेदवार माजी नगरसेवक शहाणे प्रभाग 29 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार असणार होते मात्र त्यांचा भाजपचा एबी फॉर्म असलेला अर्ज उशिरा आल्याने रद्द करण्यात आला होता त्यामुळे प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर यांच्यासमोर माजी नगरसेवक मुकेश शहाणे हे अपक्ष उमेदवारी करून आव्हान उभे करतात की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून माघार घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे

![]()












