चिनी नागरिकाने बाजारात आणले होते ऍप

मुंबई : ऑनलाइन गेम खेळा आणि भरघोस रकमेची बक्षीस जिंका, असे आमिष दाखवत दररोज हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या दानी- डेटा ॲप कंपनीला ईडीने दणका दिला असून बंगळूर सह सहा ठिकाणी छापेमारी करत 16 कोटी 43 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका चिनी नागरिकाने गुजरात मधील काही व्यावसायिकांना हाताशी धरून डिसेंबर 2021 मध्ये दानी -डेटा हे ॲप बाजारात आणले होते. गुगल प्ले वरून हे ॲप उपलब्ध झाले होते. या ॲपद्वारे लोकांना विविध प्रकारच्या गेम्स खेळण्याची सुविधा देण्यात येत होती. या करता या ॲपच्या वॉलेटमध्ये काही पैसे शुल्कापोटी भरावे लागत होते त्यानंतर खेळण्याची सुविधा होती. सुरुवातीला जे लोक खेळले व जिंकले त्यांना त्यांच्या एकूण पैशांवर पाऊण टक्के आणि अधिक दराने बक्षीस देण्यात आले. मात्र जून 2022 मध्ये ॲपल google प्ले वरून गायब झाले होते. तर ज्यांनी हे ॲप डाऊनलोड केले होते ते देखील चालणे बंद झाले होते. त्यामुळे हजारो लोकांचे कोट्यावधी रुपये गायब झाले होते.या प्रकरणी सर्वप्रथम गुजरातमधील पालनपूर येथे सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता मात्र या घोटाळ्याची व्याप्ती देशभरात असल्यामुळे या तपासाची सूत्रे ईडी ने हाती घेतली.
![]()











