प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर अवहेलनेचा आहे

नाशिक : प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर माझी अवहेलना केली गेली त्याचा आहे असे म्हणत छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर टीका केली.आज कार्यकत्यांची बैठक झाल्यानंतर भुजबळांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंत्रीपद कोणी नाकारलं हे शोधावं लागेल. प्रत्येक पक्षाचा निर्णय हा त्या पक्षाचा प्रमुख घेत असतो. भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, तसं शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. तसंच आमच्या पक्षाचा निर्णय अजित पवार घेतात. प्रत्येकाला मंत्रिपद हवं असते. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली, त्याचा आहे, असंही छगन भुजबळ म्हणालेत.मी मंत्रिमंडळात असावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते.हे मी कन्फर्म केले आहे.मग माझं मंत्रिपद कोणी नाकारलं ते शोधावं लागेल. नाशिक लोकसभेच्या निवडणुकीसाठी मला तयारी करायला लावली दिल्लीतील नेते यासाठी आग्रही होते मी नकार दिला त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांनीच निवडणूक लढवावी असे सांगितले. मी तयारीला लागलो त्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यास 1 महिन्याचा कालावधी लागला इतका उशीर झाल्याने मी निवडणूक लढवण्यास अखेर नकार दिल्याचेही भुजबळ म्हणाले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना व समर्थकाना शांतता राखण्याचे व आक्रमक आंदोलने न करण्यास छगन भुजबळ यांनी सांगितले.

![]()












