• Latest
  • Trending
मनधरणीमुळे माघार घेतली की? दबावाचं राजकारण झालं?

मनधरणीमुळे माघार घेतली की? दबावाचं राजकारण झालं?

June 11, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

मनधरणीमुळे माघार घेतली की? दबावाचं राजकारण झालं?

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

‘त्या’ पत्राची भीती दाखवत बंड शांत केले का? राजकीय क्षेत्रात चर्चा

नाशिक : विधान परिषद निवडणुकीत अनेक ट्विस्ट बघायला मिळाले मात्र आज गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. त्यांनी आपली भूमिका जाहीर करत माघार घेतली. त्यामुळे महायुतीचे नाशिक मधील अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर शिंदे गटाच्या शिवसेनेने देखील सुटकेचा निस्वास घेतला. गेल्या आठ दिवसांपासून गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. गोकुळ गीते यांची उमेदवारी कायम राहिल्यास महायुतीच्या अधिकृत उमेदवारास फटका बसू शकतो, अशी राजकीय गणिते मांडली जात होती. यासाठीच शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री आणि संकट मोचक उदय सामंत हे नाशिक मध्ये ठाण मानून बसले होते यादरम्यान भाजपचे मंत्री व संकट मोचक गिरीश महाजन यांच्यासोबत त्यांच्या बैठका देखील झाल्या होत्या. यादरम्यान गोकुळ गीते यांना समजावण्याचा प्रयत्न देखील झाला अखेर हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात गेली यावेळी गोकुळ गीते यांच्यासोबत या दोन्ही नेत्यांनी चर्चा देखील केल्याचे समजते त्याचबरोबर दुसरीकडे गीते यांची मनधरणी सुरू असल्याचे बोलले जात असतानाच काही राजकीय क्षेत्रातून ‘दबाव तंत्र’ वापरले गेले का? अशी चर्चा देखील सुरू आहे. या चर्चेला कारण ठरले ते राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी अतिरिक्त सरकारी वकील, उच्च न्यायालय यांना पाठवलेले एक पत्र. या पत्रामध्ये गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांना नाशिकमधील म्हाडा प्रकरणात उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे, गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी 1 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच दिवशी राज्याच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांचे गणेश गीते यांच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबतचे पत्र रिसीव्ह झाल्याचे समोर आले आहे.दरम्यान या सर्व घडामोंडीमुळे आता उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. गोकुळ गीते यांनी महायुतीमधील नेत्यांच्या मनधरणीमुळे माघार घेतली की? दबावाचं राजकारण झालं? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले. गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे, त्यांच्यावर कोणतंही दबावतंत्र नाही. गीतेंबाबत भविष्यात विचार केला जाईल. म्हाडाचा विषय हा छोटा आणि न्यायप्रविष्ट विषय आहे. आता गीतेंना दरांडेबाबत कोणतीही तक्रार नाही असं महाजन यांनी म्हटलं आहे. सुमारे आठ दिवस रंगलेल्या या मनधरणी नाट्यानंतर गोकुळ गिते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली असली, तरी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही गेले.

Loading

Previous Post

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

Next Post

नाशकात महाविकास आघाडी कोणती छुपी रणनीती आखणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White