• Latest
  • Trending
पाच दिवसांचे बाळ चोरीला,महिलेने केला घात

पाच दिवसांचे बाळ चोरीला,महिलेने केला घात

January 5, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

पाच दिवसांचे बाळ चोरीला,महिलेने केला घात

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील प्रकार

नाशिक : शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार नवा नाही. या ना त्या कारणाने जिल्हा रुग्णालय नेहमी चर्चेत असते. काल एका अनोळखी महिलेने बाळंतीण मातेला कपडे व साहित्य आवरा मी बाळाला सांभाळते व परिसरात फिरवून आणते असे सांगून कक्षातून बाहेर पडली ती न परतण्यासाठीच .सटाणा तालुक्यातील रहिवाशी असलेली सुमन अब्दुल सलीम खान ही बाळंतपणासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 28 डिसेंबरला रात्री तिचा पती अब्दुल खान याच्यासोबत जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती उपचारानंतर महिलेची प्रसूती होऊन तिने मुलाला जन्म दिला दरम्यान बाळाचे वजन कमी असल्याने नवजात शिशुला विशेष न्यू बॉर्न बेबी कक्षात दाखल करण्यात आले त्याचबरोबर आईला अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आली. शनिवारी सकाळच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला यामुळे बाळाला तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले व कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली. रुग्णालयाला डिस्चार्ज देण्याची कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले साडेअकरा वाजेच्या सुमारास बाळाची आई सुमन खान पुन्हा रडत रुग्णालयात आल्या त्यांनी बाळ हरविल्याची तक्रार येथील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे केली याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी त्वरित लक्ष घालून घटनेची माहिती पोलिसांना कळविली यादरम्यान जिल्हा रुग्णालय पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बाळाची आई सुमन यांनी त्यांच्या तोंड ओळख असलेल्या एका महिलेकडे बाळाला सोपविले असे दिसून आल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. मागील तीन दिवसाच्या फुटेज मध्ये अनोळखी महिला तीनही दिवस बाळाला हाताळत असल्याचे दिसून येत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी महिलेला दाखविले असता तिने बाळाला घेऊन जाणाऱ्या महिलेला ओळखले असून ही महिला रुग्णालयात तिच्या पतीच्या तोंड ओळखीची असल्याचे तिने सांगितले.

बाळंतीन महिलेच्या माहितीनुसार संशयित महिला गेल्या चार-पाच दिवसांपासून बाळंतीण महिला व तिच्या पतीच्या संपर्कात होती. माझे नातलग दुसऱ्या वार्डात ऍडमिट असून त्यांची सेवा करण्यासाठी मी येत असते असे सांगत तिने मराठी व हिंदी भाषेचा भडीमार करून बाळंतीन महिलेची ओळख वाढवली. याच ओळखीचा गैरफायदा घेत संशयित महिलेने बाळ हाताळत व विश्वास संपादन करत घात केला मुख्य म्हणजे ती संशयित महिला बाळंतीण महिलेच्या ओळखीची नाही किंवा नातेवाईक देखील नाही. कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली असता त्याच्यात महिला चोर जाताना पाठमोरी दिसते. मात्र चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांनाही ओळख पटविणे अवघड झाले आहे.या धक्कादायक घटनेने जिल्हा रुग्णालय प्रशासन चक्रावून गेले आहे. या प्रकरणात बाळाचा व महिलेचा शोध पोलिसांनी सुरू केला असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक त्या महिलेचा शोध घेत आहेत.

Loading

Previous Post

“थर्टी फर्स्ट”च्या रात्री नाशकात खून

Next Post

पळवलेले बाळ अखेर मातेच्या कुशीत विसावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White