• Latest
  • Trending
दादांच्या आणखी एका मंत्र्याची विकेट पडता पडता वाचली !

नेमकं कोकाटे प्रकरण काय ?

December 18, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नेमकं कोकाटे प्रकरण काय ?

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का

नाशिक : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी 1997 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांसाठी असलेल्या योजनेद्वारे शहरातील कॅनडा कॉर्नर भागात एका इमारतीमध्ये चार सदनिका मिळवल्याचा आरोप होता. या प्रकरणी 1997 साली सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी राज्य मंत्री तुकाराम दिघोळे यांनी त्यावेळी राज्य सरकारकडे याबाबत तक्रार केली होती. या प्रकरणात गेल्या फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने कोकाटे व त्यांच्या भावाला दोषी धरले होते त्या विरोधात त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते मात्र अपिलातही त्यांना दिलासा मिळू शकला नाही शासनाच्या वतीने तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी सरकार वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय यांच्यासह पोपट सोनवणे, प्रशांत गोवर्धने यांच्याविरुद्ध 1997 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालांतराने संबंधितांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. फेब्रुवारीमध्ये अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर सी नरवाडीया  यांच्या न्यायालयाने कोकाटे बंधूंना या प्रकरणात दोषी धरले होते. दोघांना दोन वर्षाचा कारावास व प्रत्येकी 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. सोनवणे व गोवर्धने यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या निकालाच्या विरोधात कोकाटे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी धरत दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली न्यायालयाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी न्यायालयाने त्यांना अटक करण्यात यावी असे वॉरंटही काढले. त्यांच्या वतीने न्यायालयाला कोकाटे यांची प्रकृती बिघडलेली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा अर्ज वकिलांकडून दाखल करण्यात आला मात्र न्यायालयाने त्यांना फटकारत रुग्णालयात भरती झाल्या बाबतचे अधिकृत लेखी पुरावे सादर करावेत असे सांगितले तसेच मंगळवारी अंतिम सुनावणी प्रसंगी गैरहजर का राहिलात असा प्रश्नही विचारला अन अर्ज फेटाळला त्यानंतर कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली परंतु न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी ठेवली दोषसिद्धी स्थगित करण्याच्या कोकाटे यांच्या मागणीवर विचार केला जाईल असे एकलपीठाने स्पष्ट केले. कोकाटे हे तर सधन न्यायालयात कोकाटे यांचा व्यवसाय वकिली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र वडिलोपार्जित जमिनीचे सातबारा उतारे, विवरणपत्र आणि साखर कारखान्यात त्यांच्या शेतातून जाणारा ऊस यामुळे त्यांची परिस्थिती सदन असल्याचे कनिष्ठ न्यायालयात यापूर्वी सिद्ध झाले होते.

Loading

Previous Post

राजकीय क्षेत्रात खळबळ, कोकाटेंचा मंत्रीपदाचा राजीनामा

Next Post

नाशकात ऐन निवडणुकीत भाजपने कॅप्टनच बदलला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White