• Latest
  • Trending
निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवक पटेल यांना भोवलं

निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवक पटेल यांना भोवलं

May 13, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवक पटेल यांना भोवलं

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नगरसेवक मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई

नाशिक : टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या कौसर पार्क येथील घरावर आणि नारेगाव येथील कार्यालयावर महापालिकेने मंगळवारी २४ तास मुदतीची नोटीस चिटकवली होती. त्यानंतर निदाला, पटेलने ज्या घरात लपवलं, त्याच्यावर बुधवारी सकाळी सकाळी बुलडोझर चालवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कारवाई करत हे घर जमीनदोस्त केलं. ही कारवाई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात केली आहे. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. मतीन पटेलने तिला आपल्या घरात आश्रय दिला होता. यानंतर 9 मे रोजी महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. आणि 72 तासांत उत्तर मागितले होते. आज मतिन खानच्या त्या घरावर देखील बुलडोजर चालवण्यात आलं.निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना पोलिसांपासून वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित स्थळ मिळवून देण्यात मतीन पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. केवळ राहण्याची सोयच नाही, तर तपासाची दिशा भरकटवण्यासाठी आणि पोलिसांपासून लपून राहण्यासाठी पटेल यांनी निदा खानला वेळोवेळी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना सहआरोपी देखील करण्यात आलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अधिकाऱ्यांना संविधानाच्या प्रती भेट
यादरम्यान परिसरातील काही महिला महापालिका अधिकाऱ्यांसमोर फुले घेऊन पोहोचल्या आणि त्यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले. या महिलांनी अधिकाऱ्यांना संविधानाच्या प्रतीही भेट दिल्या. कायद्याचे पालन व्हायला हवे, मात्र कारवाई संविधान आणि न्यायिक प्रक्रियेच्या चौकटीत राहूनच केली पाहिजे, असे या महिलांचे म्हणणे होते. महिलांच्या या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस तैनात होते आणि संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण होते. बुलडोझर कारवाईदरम्यान स्थानिक लोकांचीही मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याचे दिसून आले. या कारवाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले आहेत. एमआयएमच्या नेत्यांनी ही कारवाई राजकीय दबावाखाली केली जात असल्याचे म्हटले आहे, तर प्रशासनाचे म्हणणे आहे की, अनधिकृत बांधकामावर नियमांनुसार कारवाई केली जात असून कायद्यापेक्षा मोठे कोणीही नाही.

Loading

Previous Post

NEET Paper घोटाळ्याचे केंद्र ‘नाशिक’ मात्र पोहोचला देशभर

Next Post

उपजिल्हाधिकारी निलंबित अशोक खरात प्रकरण अंगलट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White