• Latest
  • Trending
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

बंड शमविण्यात महायुतीला मोठे यश !

नाशिक : भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेला थोड्याफार प्रमाणात हायसे वाटले आहे. विधानपरिषद निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर महायुतीमध्ये अनेक ट्विस्ट आले. अधिकृतपणे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटून गेल्यानंतरही महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. यादरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न करून देखील यश येत नसल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेत टेन्शन होते. मात्र आज नाट्यमय घडामोडी घडत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी दाखल झाले. मुख्य म्हणजे, शिंदे गटाच्या शिवसेनेच्या या दोन्ही मंत्र्यांसोबत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे हे देखील उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या हितासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले. यामुळे महायुतीसमोरील एक अडथळा दूर झाला आहे. दरम्यान, नाशिकमधील बंडखोरीच्या माघारीवरच जळगाव निवडणुकीचा तिढा अवलंबून आहे. याठिकाणी भाजपची चिंता अजूनही कायम आहे. येथे भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. काळे यांची समजूत काढण्यासाठी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी अनेक बैठका घेतल्या, मात्र त्यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता नाशिकमध्ये प्रसाद हिरे यांनी माघार घेतल्यामुळे, जळगावातही या बंडखोरीचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे. तर दुसरीकडे भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू व बंडखोर गोकुळ गीते यांनी नागरिकांच्या भेटी गाठी सुरू केल्या आहेत यादरम्यान पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला असता मंत्री गिरीश महाजन म्हणाले की गोकुळ गिते यांच्यासोबत फोनवर चर्चा सुरू आहे त्यामुळे आज रात्रीपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचेही ते म्हणाले.

Loading

Previous Post

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

Next Post

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White