• Latest
  • Trending
नाशिक हादरले ! नामांकित IT कंपनीत महिलांवर अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप 

नाशिक हादरले ! नामांकित IT कंपनीत महिलांवर अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप 

April 8, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक हादरले ! नामांकित IT कंपनीत महिलांवर अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप 

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

पीडित महिलांच्या तक्रारीसाठी पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी 9123232311

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि कथित पत्रकार , व्यावसायिक रवींद्र एरंडेच्या लैंगिक शोषणाच्या घटना चर्चेत असतानाच नाशिकमध्ये आता एका नामांकित आयटी बहुराष्ट्रीय कंपनीत तसाच प्रकार घडल्याचे समोर आल्याने  खळबळ  उडाली आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले आहेत.  यामध्ये धार्मिक भावना दुखावणे १, बलात्कार १, विनयभंग ४, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावणे ३ असे एकूण ९ गुन्हे मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कंपनीतील टीम मॅनेजर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी 18 ते 25 वयोगटातील तरुणींना जाळ्यात ओढले. करिअरची भीती दाखवून किंवा पदाचा गैरवापर करून या मुलींवर अत्याचार करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये केवळ शारीरिक शोषणच नाही, तर पीडितांच्या धार्मिक भावना दुखावल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. या छळामुळे तरुणी मानसिक तणावाखाली होत्या.मुख्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या बेताची आणि गरजू पार्श्वभूमी असलेल्या तरुणींना मुद्दाम टार्गेट करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले.धर्माशी संबंधित जबरदस्तीचे आरोप असून पीडितांना दिलेल्या तक्रारीनुसार काही महिला पीडितांना जबरदस्तीने धार्मिक प्रथा पाळायला भाग पाडण्यात येत होते.याशिवाय, एका पुरुष पीडिताचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. त्याचे नाव बदलून त्याला विशिष्ट धार्मिक पेहरावात वावरण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. एका गुन्ह्यात तर पीडितेला फोटो व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवत आरोपीच्या मित्रानेही अत्याचार केले आहेत. त्याला देखील आरोपी करण्यात आले आहे. 25 मार्च 2026 रोजी नाशकात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व घटना 2022 पासून सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, आतापर्यंत अनेक  महिलांसोबत हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय.या प्रकरणात कंपनीतील एका महिला मॅनेजरवरही दुर्लक्ष केल्याचा आरोप असून तिलाही यामध्ये आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  आहे.  एसआयटीची स्थापना या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून यात 20 ते 25 मुली बळी पडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक पोलीस आयुक्तांनी  संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. ही टीम आता कंपनीतील अंतर्गत कामकाजाची आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागाची चौकशी करत आहे. या प्रकरणात एकूण 6 आरोपी असून 5 पुरुष आणि एका महिलेचा सहभाग आहे. 5 पुरुष आरोपींना अटक असून एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. पाचही आरोपीना आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे.             पीडित महिलांच्या तक्रारीसाठी पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी 9123232311
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. सर्व खासगी संस्थांना महिलांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. आणखी पीडित महिलांच्या तक्रारीसाठी पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी 9123232311 तसेच कंट्रोल रूम 112 वर संपर्क करता येणार आहे. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. भोंदू बाबा अशोक खरात नंतर नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीतील आणखी महिलांचे लैंगिक शोषणाचा प्रकरण समोर आल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

Loading

Previous Post

कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स

Next Post

नाशिकच्या त्या महिला कर्मचाऱ्यांना परदेशात विकायचा होता प्लान– आ. गोपीचंद पडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White