परिसरात भीतीचे वातावरण, पोलिसांचा शोध सुरू

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झाली असून नाशिक शहर हे धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक शहर म्हणून ओळखले जाते, मात्र अलिकडच्या वर्षांतील गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल कि, नाशिक शहर क्राईम कॅपिटल अशी नवी ओळख निर्माण करू पाहत आहे. दर दिवसाआड एक खुनाची घटना समोर येत आहे. नाशिकरोड परिसरातील नवले कॉलनीजवळील प्रेस मैदानात एका तरुणाचा अत्यंत निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव अजय शंकर भंडारी (24, रा. सिन्नर फाटा, स्टेशन वाडी ) असे असून नवले कॉलनीच्या बाजूच्या मैदानात त्याचा मृतदेह मिळून आला.घटनेची माहिती मिळताचवरील पोलीस निरीक्षक अशोक गिरी पथकासह घटनास्थळी पोहचले असता मृतदेहा शेजारी दोन मोठे दगड सापडले असून जवळच त्याची दुचाकी (MH 15 GY 8057) मिळून आली आहे.
प्रथमदर्शनी डोक्यात जोरदार दगडाने वार करून ठार मारण्यात आले असून युवकाच्या हातावर व बोटांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे दिसून येत आहे.अजय भंडारी सिन्नर फाटा रेल्वे स्थानकाच्या पार्किंग मध्ये काम करत होता. रात्री दीड वाजेच्या सुमारास त्याने आई बरोबर शेवटचा संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. खुनाचा गुन्हा दाखल करत संशयितांची शोधासाठी विशेष पोलीस पथक नियुक्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
![]()












