युध्दपातळीवर बिबट्याची शोध मोहीम सुरू, 2 ते 3 नागरिक जखमी

नाशिकच्या गंगापूर रोड,महात्मा नगर परिसरात बिबट्या नागरी वस्तीत शिरला असून मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने दोन-तीन जणांवर हल्ला केल्याचे समजत आहे. बिबट्याचा शोध आता युद्ध पातळीवर घेतला जात आहे.राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या बिबट्याची दहशत बघायला मिळत असून पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या असतानाच नाशिकमधून आता मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात भरनागरी वस्तीत बिबट्या शिरला आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून बिबट्याने दोन-तीन जणांवर हल्ला केल्याची माहिती आहे.संत कबीरनगर झोपडपट्टी आणि वन विहार कॉलनीत बिबट्याने धुमाकूळ घातल्याची माहिती आहे. परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार दोन बिबटे होते. यापैकी एक बिबट्या पळून गेला. तर दुसरा बिबट्या हा नागरी वस्तीत शिरलाअसून तो एका घरातून दुसऱ्या घरात जात आहे. तो आता लपून बसला आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आणि वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरु आहे.

![]()












