खून झालेला महेंद्रा मूळ नेपाळचा !

नाशिक : शहरातील सातपूरच्या कामगार- नगरमधील गुलमोहर कॉलनी भागातील एका सोसायटीत राहणाऱ्या हॉटेलमधील तरुण “कुक” चा अज्ञात व्यक्तींनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सातपूर परिसरातील गुलमोहर कॉलनी मध्ये कौशल्य विला नावाची अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत हॉटेलमध्ये काम करणारे 10 ते 12 लोक एकत्रितपणे राहत होते. त्यांच्यामध्ये महेद्रा हा देखील राहत होता. रात्रीच्या सुमारास तो मोबाईल वरून कोणाशी तरी बोलत होता. यानंतर तो गच्चीवर गेला आणि तेथेच त्याच्यासोबत घातपात झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोसायटीच्या पार्किंग मध्ये सकाळी मृतदेह एका चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळला. यानंतर रहिवाशांनी पोलिसांना डायल 112 हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांसह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिताराम कोल्हे, शेखर देशमुख, यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी मूर्तदेहाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. महेद्रा याच्या सोबत राहणारे अन्य कामगाराकडेही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. काही कामगार या घटनेनंतर फरार झाल्याचे बोलले जात असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे महेद्रा हा मध्यरात्री घरातून बाहेर येत इमारतीवर कशासाठी गेला ? त्याचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला ? त्याचा शोध आता सातपूर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट -1 चे पथक घेत आहे. महिंद्रा हा मूळ नेपाळचा रहिवासी…………………… तो मागील तीन वर्षापासून नाशिक मधील सातपूर भागातील कामगार नगर मध्ये वास्तव्यास होता. तो येतील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता. त्याचे संपूर्ण कुटुंब नेपाळमध्ये असून येथे काही मित्रपरिवार व सोबत काम करणारे काही लोक आहेत. असे पोलिसांनी सांगितले त्याच्या नातेवाईकांची माहिती मिळवली जात असून त्यांना संपर्क करून माहिती दिली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी “ब्लॅक अँड व्हाईट” न्यूज शी बोलताना सांगितले.
![]()












