• Latest
  • Trending
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

शिंदे गटाच्या शिवसेनेला गीतेबंधूंची धास्ती

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली होती. वाटाघाटीत ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळाली मात्र मित्र पक्ष असलेल्या भाजपात झालेली बंडखोरी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने उमेदवार न देण्याची केलेली खेळी यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यासमोर आव्हान उभे ठाकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात माघारीची मुदत उद्या (गुरुवारी) संपत असताना मित्रपक्षातील बंडखोरीमुळे शिंदे  गटाच्या शिवसेनेची  चिंता वाढली आहे. शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकून असून माघारीसाठी बंडखोरांची त्यांनी  मनधरणी केली यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी बंडखोरांशी भ्रमणध्वनीवर संपर्क केल्याची माहिती  मिळत आहे. बंडखोरी करणारे भाजपचे गणेश गिते आणि त्यांचे बंधू गोकूळ गिते यांची समजूत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन काढतील आणि त्यांची माघारी होईल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला आहे. आपल्या मार्गातील अडसर दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गट सक्रिय झाला असून त्यांची संपूर्ण आशा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर असल्याचे चित्र आहे. भाजपचे प्राबल्य असणाऱ्या या मतदारसंघात नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यात भाजपशी संबंधित गणेश गिते, त्यांचे बंधू गोकूळ गिते तसेच प्रसाद हिरे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवृत्ती बोडके आणि विष्णू म्हैसधुणे यांचाही समावेश आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला गीते बंधूंची भीती  महापालिकेचे माजी स्थायी सभापती गणेश गिते आणि त्यांचे बंधू गोकूळ हे निवडणुकीवर विविध मार्गाने प्रभाव टाकू शकतात, हे  शिंदे गटाच्या शिवसेनेच्या लक्षात आल्यावर त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी मुंबई सोडत मंत्री उदय सामंत यांनी नाशिकला ठाण मांडत बंडखोरांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या.  गणेश गिते हे नाशिकमध्ये असते तर आपण त्यांचीही भेट घेतली असती, असे सामंत म्हणाले. गणेश गिते हे मुंबईत असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याची आपली माहिती आहे. गिते बंधूंची उमेदवारी मागे घेण्यासाठी मंत्री महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. ते चर्चा करून समजूत काढतील. गिते बंधू हे माघार घेतील आणि नरेंद्र दराडे यांचा विजय सुकर होईल, ही आम्हाला खात्री आहे. असेही मंत्री सामंत म्हणाले.  तर दुसरीकडे मविआ (उद्धव ठाकरे गट) कडून सुरुवातीला चुरस निर्माण होईल असे वाटत होते, पण नंतर त्यांनी ऐनवेळी आपला उमेदवार रिंगणातून मागे घेतल्याने निवडणुकीच्या समीकरणात मोठा बदल झाला आहे याठिकाणी नगरसेवकांमध्ये संताप असून पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदानाचा अधिकार असलेल्या नगरसेवकांच्या मते, किमान उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत निवडणुकीची उत्सुकता कायम ठेवायला हवी होती. अशी  चर्चा  आहे

Loading

Previous Post

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

Next Post

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White