माजी विरोधीपक्ष पक्षनेते अंबादास दानवे यांचा खळबळजनक आरोप

नाशिक : शहरात गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतल्याने अनेक गुन्हेगार व त्यांचे बॉस नाशिक सोडून फरार झाले आहेत. तर अनेकांची दिवाळी जेल मध्ये साजरी झाल्याचे चित्र आहे.मात्र यादरम्यान माजी विरोधी पक्षनेत्याने दिवाळी संपताच एक मोठा बॉम्ब फोडल्याने शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाशिकच्या एका भाजप आमदाराला मारण्याची सुपारी नाशिकच्या एका माजी नगरसेवकाने दिल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. मुख्य म्हणजे हा संबंधित नगरसेवक हा पक्षाचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा समर्थक असल्याचा देखील दावा केला आहे. विशेष म्हणजे संबंधित आमदार कोण ?आणि नगरसेवक कोण ? यांची नावे आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे गृहमंत्री त्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्नही केला आहे. नांदेडमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. काही महिन्यांपूर्वी गोळीबार आणि खुनाच्या प्रकरणात भाजपचे दोन माजी नगरसेवक तुरुंगात आहेत. तर अनेक गुन्हेगारांना पोलिसांनी प्रसाद देत इशारा दिला आहे यादरम्यान हा प्रकार कळाला का ?त्याचबरोबर दानवे यांच्या विधानामुळे तो माजी नगरसेवक कोण ? आमदार कोण ? याविषयी शहरात जोरदार चर्चा आहे तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र या आरोपाचा इन्कार केला असून माझा एकच समर्थक नगरसेवक आहे तर उर्वरित नगरसेवक विरोधक आहेत का ? असा टोला लगावला तर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मात्र दानवे यांच्या आरोपानंतर चलबिचल सुरू झाली असल्याचे समजते.

![]()












