• Latest
  • Trending

नाम और चिन्ह में क्या रखा है ?

June 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाम और चिन्ह में क्या रखा है ?

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नावात,चिन्हात गोधळ करा आणि मते खाऊन कोंडी करा

नाशिक: शिक्षक विधान परिषद मतदार संघात निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राडा बघावयास मिळाला हा राडा सारखे नाव असल्यामुळे झाला. दुपारी कोपरगाव येथील किशोर प्रभाकर दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सध्या विद्यमान आमदार किशोर भिकाजी दराडे आहेत, त्यांच्या समर्थकांच्या ही बाब लक्षात येताच मोठा गोधळ झाला. यावेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे किशोर प्रभाकर दराडे यांना मारहाण देखील करण्यात आली. हा वाद नाशिकरोड पोलीस ठाण्यात तब्बल सात तास रंगला. अखेर कोपरगावच्या अपक्ष उमेदवार असलेले दराडे यांना व त्यांच्या कुटूंबियांना पोलीस गाडीतून दंगा नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात घरी पाठवण्यात आले. खर तर या सर्व घटनांचे मूळ लोकसभा निवडणुकीत आहे. सारखी नावं आणि सारखीच दिसणारी चिन्ह यातून संभ्रम निर्माण करायचा आणि मातब्बरांची मते खाऊन कोंडी करायची असे प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत बघावयास मिळाले मात्र त्यानंतर निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार कमालीचे सक्रिय झाले. एका चित्रपटात एक डायलॉग होता …नाम मे क्या रखा है… मात्र आता नावातच सगळं असत असे म्हणण्याची वेळ आली आहे.लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने 10 जागा लढविल्या. या सर्व मतदार संघात शरद पवार गटाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह भेटले .तर निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हांच्या यादीत ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेखही तुतारी असा करण्यात आला. मग काय याचाच फायदा उठवत शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात विरोधकांनी उमेदवार मुद्दामहुन उमेदवार उभे करून तुतारी चिन्ह मिळण्याची तजवीज केली आणि याचठिकाणी मतदारांचा गोधळ उडाला आणि तुतारी अर्थात ट्रम्पेट या चिन्हावर उमेदवारांना मिळालेली मते 4 लाख 32 हजार 211 मते ही आश्चर्यचकित करणारी आहेत. खरतर ट्रम्पेट हे ब्रिटिश वाद्य मात्र याला आपल्याकडे वाजंत्री अथवा पिपाणी म्हणतात तर निवडणूक आयोगाने याला तुतारी हे नाव दिले खेड्या-पाड्यात तुतारी वाजवून चिन्हाचा प्रचार करण्यात आला आणि याच ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. साताऱ्यात तर यामुळे शरद पवार गटाचा उमेदवार पडला. या ठिकाणी तुतारी आणि पिपाणी हे चिन्ह एकाचवेळी असल्याने गोधळ झाला आणि पिपाणीला दीड लाख मते पडली आणि शरद पवार गटाचा उमेदवार अवघ्या 45 हजार मतांनी पडला यात 37 हजार मते पिपाणीला गेली. असे खुद्द शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. माढ्यात देखील पिपाणी चिन्ह घेऊन लढणाऱ्या रामचंद्र घुटूकडे यांना 58 हजार421 मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. बारामती सोयलशहा शेख यांच्या पिपाणीला 14 हजार 917 मते पडली आणि ते चौथ्या क्रमांकावर राहिले, शिरूर मध्ये देखील मनोहर वाडेकर यांच्या पिपाणीला 28 हजार 330 मते पडली ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अहमदनगर येथील मोहन आळेकर यांच्या पिपाणीला 44 हजार 597 मते मिळाली ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. रावेरमध्ये एकनाथ साळुंके यांच्या पिपाणीला 43 हजार982मते मिळाली ते चौथ्या क्रमांकावर राहिले, भिवंडीत कांचन वखारे यांना24 हजार 635 मते मिळाली त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या. बीड मध्ये अशोक थोरात यांच्या पिपाणीला 54 हजार 850 मते मिळाली.यावरून मतदारांचा झालेला गोधळ लक्षात येतो.दिंडोरीत तर अशी घटना घडली की परिसरातील नागरिकांमध्ये लोकसभा निवडणूक होऊन देखील आजपण चर्चा सुरू आहे असे कसे होऊ शकते. दिंडोरीत महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार उभ्या होत्या त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे उमेदवार होते ते पेशाने शिक्षक असल्याने त्यांची ओळख सर म्हणून आहे. मात्र याच मतदार संघात बाबू भगरे हे अपक्ष म्हणून उभे राहिले विशेष म्हणजे त्यांचा नावापुढे सर म्हणून उल्लेख होता त्यांची माहिती घेतली असता बाबू भगरे हे तिसरी पास असून ते मोलमजुरी व मासेमारी करतात तरीदेखील त्याच्या नावापुढे सर लावण्यात आले होते. ते निवडणूक लढवत असल्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांना देखील नव्हती, मुळात त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह पिपाणी म्हणजेच तुतारी होती. आणि भास्कर भगरे सरांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी होती. या मतदारसंघात बाबू भगरे यांच्या पिपाणीने तब्बल 1 लाख 3 हजार 632 मते मिळवली आणि परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला.त्याचबरोबर नावात साम्य बघता अनेक ठिकाणी त्याच नावाचे उमेदवार उभे करण्यात आले .त्यामुळे राजकारणात एकमेकांना कुरघोडी करण्याचे प्रकार हे वाढतच जाणार मात्र मतदारांनी आता जागृत राहण्याची गरज असून उमेदवार देखील आता ताक फुकुन पीत आहेत म्हणूनच काल शिक्षक मतदार संघात उमेदवारी दरम्यान झालेला गोधळ याचीच सुरवात आहे..

Loading

Previous Post

राजमाता जिजाऊ तरण तलाव उन्हाळी शिबिराला प्रचंड प्रतिसाद

Next Post

मैं नरेंद्र दामोदरदास मोदी… तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेतली शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White