पक्ष व चिन्हाबाबत आदेशाचे करा पालन !

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारांमध्ये पक्षाचे नाव चिन्हाबाबत उल्लेख करताना निर्देशाचे पालन करावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गट आणि अजित पवार गटाला दिली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पिठाने 19 मार्च रोजी पक्षाच्या नाव व चिन्ह वापरा संदर्भात दिशानिर्देश दिले होते या निर्देशाचे पालन होत नसल्याच्या दोन्ही गटांच्या याचिकावर सुनावणी पार पडली शरद पवार गटाने आगामी निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे चिन्ह वापरावे व त्या संदर्भात पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचित करावी तसेच अजित पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालेले घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ठ असल्याचा उल्लेख दैनिकांमध्ये नोटीस जारी करून तसेच प्रचारादरम्यान फलकांवरील उल्लेख करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायप्रविष्ठ जाहिरात प्रसिद्ध करण्याची ग्वाही………. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ठ असल्याच्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध करण्यात येतील. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही अजित पवार गटाच्या वतीने देण्यात आली

![]()












