• Latest
  • Trending
दुहेरी हत्याकांडाचा तपास ‘एसआयटी’ करणार

दुहेरी हत्याकांडाचा तपास ‘एसआयटी’ करणार

April 4, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

दुहेरी हत्याकांडाचा तपास ‘एसआयटी’ करणार

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

नाशिक : रंगपंचमीच्या दिवशी शहरातील बोधलेनगर जवळ असलेल्या आंबेडकरवाडीत दोन टोळ्यांच्या वर्चस्ववादातून प्रशांत भगवान जाधव व उमेश भगवान जाधव या दोन सख्या भावांची टोळक्याने निर्घृणपणे धारदार शस्त्राने वार केले होते. गंभीर जखमी होऊन झालेल्या रक्तस्त्रावामुळे दोघांचाही रुग्णालयात नेताना मृत्यू झाला होता.

यामध्ये संशयित आरोपी सागर मधुकर गरड (32) योगेश चंद्रकांत रोकडे (30)अनिल विष्णू रेडेकर (40)सचिन विष्णू रेडेकर (44)अविनाश उर्फ सोनू नानाजी उशीरे (26)यांना खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. पूर्ववैमनस्यातून व परिसरातील वर्चस्ववादातून हे हत्याकांड झाल्याचे पोलिसांच्या तपासातून प्रथमदर्शनी समोर आले होते. मात्र तपासात काही त्रुटी ठेवण्यात आल्या असून तपासात हलगर्जीपणा केला जात असल्याचा तक्रारी आयुक्तालयापर्यंत पोहचल्या नंतर या खुनाच्या गुन्ह्याचा सखोल तपासाकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार स्वतंत्र स्थानिक एसआयटी म्हणजेच विशेष पथक स्थापन करण्यात आले. या पथकाचे प्रमुख म्हणून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली या पथकात विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनगर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक किरण शेवाळे, नाशिकरोड पोलीस स्टेशनचे अजित शिंदे, अंमलदार सचिन वाळुंज, रवी शितोळे आदींचा समावेश करण्यात आला आहे . 15 दिवसांनंतर एस आयटी स्थापनेचा आयुक्तालयाने निर्णय घेतला असून गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या पर्यवेक्षणाखाली पथक दुहेरी हत्याकांडाचा सखोल तपास करणार असून तपासाच्या प्रगतीबाबत वेळोवेळी आयुक्तांना पथकप्रमुख माहिती देणार आहेत.

Loading

Previous Post

नाशकात एका रुपयाच्या वादातून व्यक्तीचा खून 

Next Post

12 कोटींना गंडा घालणारा भामटा गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White