मजुराच्या घरात 11 लाख तर मोटारीतून 20 लाख 50 हजारांची रोकड जप्त

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशिक शहरात देखील रोकड हस्तगत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव बहुला नाक्यावर संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू असतानाच एका बॉडी पॅक चारचाकीत पोलिसांनी 20 लाख 50 हजार रुपये जप्त केले मुख्य म्हणजे ही रक्कम चोरट्या पध्दतीने नेली जात होती. तर दुसरीकडे जय भवानी रोडवरील भालेराव मळ्यात एका बिगारी मजुराच्या घरात छापा टाकला असता 11 लाख रुपये मिळून आली याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती . या दोन्ही घटनेत संबंधितांना समाधानकारक माहिती देता आली नाही.पोलिसांना सापडलेल्या पैशाचा राजकीय व्यक्ती किंवा पक्षाशी संबंध आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

![]()











