• Latest
  • Trending

“तो” गोळीबार गावठी कट्टा की एअरगनमधून ?

September 27, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“तो” गोळीबार गावठी कट्टा की एअरगनमधून ?

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

तब्बल तीन दिवसानंतर या घटनेची वाच्यता

नाशिक : विधानसभा निवडणूका  घोषित होण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना नाशिक येथील जेलरोड परिसरात राजकीय पक्षाच्या नेत्याकडून गोळीबार झाल्याने व मुख्य म्हणजे या प्रकरणाची वाच्यता तीन दिवसांनंतर झाल्याने  राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेलरोड येथील मॉडेल कॉलनीत असलेल्या वसंत विहार कला व क्रीडा मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बर्वे आहेत. मात्र यावर्षी नवरात्रोत्सव अध्यक्षपदी सुयोग गुंजाळ यांची निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास मॉडेल कॉलनीत सुयोग गुंजाळ उभा असताना त्याला नितीन बर्वे यांचा फोन आला यावेळी फोनवर सुयोग गुंजाळ म्हणाला मी नवरात्रोत्सवाची तयारी करण्यासाठी धावपळ करत आहे, तुम्ही कोठे आहात, अशी विचारणा केली असता नितीन याने सुयोग गुंजाळ याला सांगितले की मी संतोष पिल्ले यांच्यासोबत असून नवरात्रोत्सवाच्या देणगीची बोलणी करत असल्याचे सांगितले. त्यावेळी सुयोग गुंजाळ म्हणाला तो उडत गेला, मला नको अध्यक्षपद, नाही करायची नवरात्र असे फोनवरून संतापात सांगितले याच कारणावरून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास सुयोग गुंजाळ घराबाहेर उभा असताना कारमध्ये संतोष पिल्ले, नितीन बर्वे, आणि अजून दोन साथीदार तेथे आले त्यांनी सुयोगला गाडीत बसण्यास सांगितले मात्र सुयोगने नकार दिल्याने ते सर्वजण पुन्हा नवरात्रोत्सवाच्या जागेवर गेले. तर सुयोग घराच्या दिशेने निघून गेला काही वेळातच सुयोगला फोन आला संतोष पिल्ले याने बंदुकीतून फायरिंग केली आहे, तू इकडे येऊ नको. या घटनेने घाबरलेल्या सुयोगने नाशिकरोड पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. तीन दिवसांनी या घटनेची वाच्यता झाल्याने पोलीस खडबडून जागे झाले असून यामध्ये एकास अटक करण्यात आली आहे तर उर्वरित संशयितांनाचा नाशिकरोड पोलीस शोध घेत आहेत.       गोळीबार गावठी कट्टा की एअरगनमधून ? दरम्यान गोळीबाराची जोरदार चर्चा परिसरात सुरू असून नेमका गोळीबार गावठी कट्यातून झाला की एअरगणमधून याचीच चर्चा सुरू असून संशयीत पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे मात्र यामध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे नाव आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading

Previous Post

माझी प्रकृती स्थिर,चिंता करण्याचे कारण नाही -भुजबळ

Next Post

सावकार हा पोलीस असल्याचा संशय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White