नाशिक शहरातील विडी कामगार नगर भागातील घटना

नाशिक : आग्रा रोडवरील विडी कामगार नगरमध्ये काही महिलांसह,सराईत मुलांनी तरुणाच्या डोळ्यात मिरचीची फूड फेकत निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (दि 24) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विशांत उर्फ काळू राजाराम भोये (वय 29 रा.विडी कामगार शाळेमागे) हा तरुण कामगार नगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ मित्रांसोबत गप्पा मारत उभा असताना अचानक आठ ते दहा सराईत मुले, महिला,पुरुष त्या ठिकाणी आले त्यांनी तिन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या लहान मुलांच्या वादातून कुरापत काढत भोये यास शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान काही महिलांनी त्याच्या डोळ्यात मिरचीची फूड फेकली.यातील एका संशयीताने भोये याच्यावर कोयत्याने हल्ला केला. इतरांनी देखील मोठ्याप्रमाणात हल्ला केला यादरम्यान वर्मी घाव लागल्याने भोये रक्ताच्या थारोळ्यात कोसळला यावेळी भोये याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. आडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यावेळी मयतभोये यांच्या नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी करत संशयितांना अटक करण्याची मागणी केली. तोपर्यंत मूर्तदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केल्याचे समजते.

![]()












