• Latest
  • Trending
“छोट्या भाभी”ला ड्रग्जविक्रीत मदत करणारे गजाआड

“छोट्या भाभी”ला ड्रग्जविक्रीत मदत करणारे गजाआड

October 4, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“छोट्या भाभी”ला ड्रग्जविक्रीत मदत करणारे गजाआड

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

मुंब्रा ते वडाळागाव ड्रग्ज कनेक्शन आले समोर

नाशिक : काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात नाशिकचे नाव देशात गाजले होते. कारण या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा नाशिक येथील होता त्याचबरोबर सामानगाव परिसरातील ड्रग्ज बनवण्याचा कारखाना देखील पोलिसांनी उध्वस्त केला होता. या ड्रग्ज च्या जाळ्यात युवक मोठ्याप्रमाणात अडकलेले आहेत. मुख्य म्हणजे या ड्रग्ज प्रकरणातील सुई नाशिक शहरातील वडाळा गावापर्यंत पोहचली होती. आणि यामध्ये छोटी भाभी उर्फ नसरीन हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या .मात्र आता पुन्हा वडाळागावातील एमडी ड्रग्ज प्रकरण वर्षेभरानंतर चर्चेत आले आहे. या प्रकरणाचा तपास पुढे येत असून यामध्ये वडाळागावातील छोट्या भाभीच्या साथीदारांना गजाआड करण्यात यश आले आहे. काही महिन्यांपूर्वी वडाळागावातील सादिकनगर महेबूबनगर रस्त्यावरील एका टपरित नाशिक गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकला होता त्यावेळी त्या टपरीतून 1 लाख 89 हजार 260 रुपये किमतीचे 54.4 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या कारवाईत नसरीन उर्फ छोटी भाभी व तिचा साथीदार वसीम शेख त्याचबरोबर तिचा पती इम्तियाज उर्फ चिकन्या शेख यालाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा तपास पोलीस यंत्रणा करत असताना अनेकांची नावे या प्रकरणात आली हा तपास मुंबई, ठाणे, मुंब्रा, भिवंडी पर्यंत पोहचला होता. छोटी भाभीला एमडी ड्रग्ज पुरवणारा सलमान शकील फालके याला पोलिसांनी मुंब्रा मधून अटक केली होती. आणि आज छोटी भाभीला एमडी ड्रग्ज प्रकरणात मदत केल्याच्या आरोपाखाली संशयीत इरफान नूरमोहम्मद शेख (41,रा वडाळा गाव) व करणं सोनटक्के (रा नाशिकरोड) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य म्हणजे त्यावेळी छोटी भाभी मोठ्या भाभी बरोबर संबंधित असल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणात जोरात सुरू होती. मात्र इरफान हा एका आमदाराच्या जवळचा असल्याच्या नव्या चर्चेला तोंड फुटले आहे . मुख्य म्हणजे वडाळा गावात ड्रग्ज आपली पाळेमुळे पसरवत असताना या भागातील धर्मगुरू व जेष्ठ नागरिक व तरुणांनी एकत्र येत या ड्रग्जच्या विरोधात जनजागृती करत रॅली देखील काढली होती. त्याचबरोबर पोलीस आयुक्तांची भेट घेत महत्वाची माहिती दिली असताना देखील कारवाई होत नसल्यामुळे इंदिरानगर पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते .कारण इतक्या वर्षांपासून छोटी भाभी या ठिकाणी ड्रग्ज विक्री करत असताना कारवाई होत नव्हती मग या छोट्या भाभीला आशीर्वाद व पाठींबा कुणाचा होता याचीच चर्चा वडाळगावात आजदेखील सुरू आहे.

Loading

Previous Post

अखेर मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा

Next Post

भाजपाचे “अण्णा” मनसेच्या संपर्कात ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White