• Latest
  • Trending
कुंभमेळा निमित्ताने राजकीय नेते,अधिकारी यांना चाप लावण्याची तयारी सुरू

कुंभमेळा निमित्ताने राजकीय नेते,अधिकारी यांना चाप लावण्याची तयारी सुरू

July 22, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

कुंभमेळा निमित्ताने राजकीय नेते,अधिकारी यांना चाप लावण्याची तयारी सुरू

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशकात मुख्यमंत्री स्वतंत्र कुंभ नियंत्रण केंद्र स्थापन करण्याच्या हालचाली

नाशिक  : शहरात कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिककरांसाठी 35 हजार कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आल्याचे समजते. कुंभमेळा ही नाशिकच्या विकासाची पर्वणी आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. कुंभमेळ्यापूर्वी होणारी कामे ही नाशिकचा कायापालट करू शकते. त्यामुळे रस्ते, रिंग रोड आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. तरी देखील नाशिकच्या नागरिकांमध्ये उत्साह जाणवत नसून उलट कुंभमेळ्याच्या कामांमुळे नकारात्मकता पसरू लागल्याचे चित्र आहे. वाढत्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर टक्केवारी आणि राजकीय नेते आणि नगरसेवकांच्या हस्तक्षेपाची अधिक चर्चा होत आहे. त्यामुळे भाजपा अंतर्गत गटबाजी देखील वाढत असल्याचे चित्र आहे. कुंभमेळ्याच्या कामात काही विशिष्ट नगरसेवक आणि त्यांच्या निकटवर्ती यांचा दबदबा आणि हस्तक्षेप यामुळे टक्केवारी सारख्या नकारात्मक चर्चा देखील पसरत आहेत. मूळ रामकुंड परिसराचे रूप बदलण्याचा घाट, संपूर्ण शहर खोदून ठेवलेले, कागदांवर असलेले गोदावरी नदीचे शुद्धीकरण यामुळे नागरिकांमध्ये असलेली नकारात्मकता सोशल मीडियावर जाणवत असल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर भाजप मधील मंत्री आमदार आणि नगरसेवक यांच्या सुप्त संघर्ष असल्याची चर्चा सुरू आहे. नाशकात  अयोध्या सारखे वातावरण नको अयोध्येत ज्यावेळी श्रीराम मंदिराची उभारणी करण्यात आली त्यावेळी देशभरात आनंदाचे वातावरण होते. मात्र अयोध्येचे स्वरूप बदलण्यासाठी केलेली तोडफोड, अनेकांची घरे पाडणे हे सर्व भाजपच्या अंगाशी आले आणि लोकसभा निवडणुकीत आयोद्याच्या मतदार संघात भाजपचा उमेदवार पराभूत झाल्याने तो भारतात चर्चेचा विषय ठरला आहे. आता नाशिक शहरातच भाजपचे तीन आमदार असून महापालिकेत बहुमतापेक्षा अधिक संख्येने नगरसेवक आहेत अशा सत्तास्थानांना धक्का लागू नये यासाठी भाजपने आतापासून खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. प्रशासकीय यंत्रणेबरोबर नेत्यांनाही बसणार चाप कुंभमेळ्यातून जिल्ह्यात पायाभूत सुविधा मिळाव्या नाशिकचे ब्रॅण्डिंग व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रयत्न करीत आहेत. प्रयाग राज नंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथेच कुंभमेळा होत असल्याने त्याला प्रयागराज पेक्षा यशस्वी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. त्यामुळे त्या कुंभमेळ्याचा विषय त्यांनी गांभीर्याने घेतल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास दूतांना नाशिक मध्ये पाठवून काही पदाधिकारी तसेच आमदारांशी चर्चा केल्याची माहिती आहे. त्याचबरोबर काही आयएएस अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरून फोन करून कोणाचाही दबाव आला तरी चुकीची कामे करू नका असे सांगण्यात आले आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यातील आखाड्यांचे प्रशासनाशी असणारे वाद समन्वयाने सोडविण्यासाठी याआधी समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. आता रामेश्वर नाईक यांची समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व प्रकारांमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये कुंभमेळ्यावर थेट नियंत्रण राहावे यासाठी नाशिक मध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे स्वतंत्र कुंभ नियंत्रण केंद्र स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमधील जागेमध्ये कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे

Loading

Previous Post

नाशिक पुन्हा हादरले ! आर्थिक विवंचनेतून पतीने केली पत्नी व मुलाची हत्या

Next Post

नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार! पुरात अडकलेल्या पर्यटकाची थरारक सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White