खा.संजय राऊत यांचे महाविकास आघाडीला आवाहन

नाशिक : नासिक मध्ये विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गट शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारार्थ तूप साखरे लॉन्स येथे झालेल्या संवाद मिळाव्यात खासदार राऊत बोलत होते बटेंगे तो कटेंगे यासारख्या घोषणांना थारा मिळणार नसल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही नाशिकचे योगदान मोठे आहे मात्र या शहराची प्रतिमा डागाळली आहे. नाशिकला परत वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर मध्य नाशिक विधासभा मतदारसंघातून वसंत गिते यांना विधासभेत पाठवा त्यासाठी एकीची वज्रमूठ बांधण्याचे आवाहन खा संजय राऊत यांनी केले. यादरम्यान शाहू खैरे, संजय चव्हाण, बबलू खैरे, आदी मान्यवरांचे भाषणे झाली यादरम्यान भयमुक्त नाशिकसाठी वसंत गिते यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला .व्यासपीठावर शिवसेना नेते सुनील बागुल, दत्ता गायकवाड, आकाश छाजेड, यतीन वाघ, विनायक पांडे, राहुल दिवे, प्रशांत दिवे, मामा राजवाडे, उल्हास सातभाई संदीप शर्मा यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


![]()












