• Latest
  • Trending
आंतरराज्यीय गुन्हेगार इंदिरानगर पोलिसांनी केले गजाआड

आंतरराज्यीय गुन्हेगार इंदिरानगर पोलिसांनी केले गजाआड

August 10, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

आंतरराज्यीय गुन्हेगार इंदिरानगर पोलिसांनी केले गजाआड

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

गुजरातमधून नाशिकला येत करायचे सोनसाखळी चोरी

नाशिक : पादचारी महिलांवर लक्ष ठेऊन गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आले असून मुख्य म्हणजे अट्टल सोनसाखळी चोरांसह ते आंतरराज्यीय गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. या दोघा अट्टल चोरांना इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अगदी सिनेस्टाईल पाठलाग करत गजाआड केले.मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी दिवस-रात्र गस्ती घालण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत गस्त सुरू असताना वडाळागावाकडून रविशंकर मार्गाजवळ एक काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली दुचाकीवरून दोघे संशयित डिजीपीनगरच्या दिशेने जात होते. दुचाकीस्वाराने हेल्मेट तर मागे बसलेल्या व्यक्तीने टोपी व मास्क घातलेले होते. यादरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्या व्यक्तींना थांबण्याचा इशारा केला मात्र संशयितांनी दुचाकीचा वेग अजून वाढवला अखेर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला असता इंदिरानगर सिग्नल जवळ गतिरोधक आल्याने दुचाकीचा वेग कमी झाला. या दरम्यान दुचाकी सोडून संशयित गोविंदनगरच्या दिशेने पळून जाऊ लागले पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवत अखेर त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच हे अट्टल गुन्हेगार पोपटासारखे बोलू लागले मयूर दिनेश बजरंगे (40) व जिग्नेश ऊर्फ जुगणु दिनेश घासी (42) दोघेही राहणार (छारानगर, कुबेरनगर, सरदारग्राम, अहमदाबाद गुजरात) यांनी अनेक गुन्ह्याची कबुली दिली असून महिलांची सोनसाखळी ओढण्यासाठी ते थेट गुजरातमधून नाशिकला यायचे शहरात आल्यावर दिवसभरात दोन ते तीन सोनसाखळी खेचून ते पुन्हा दिंडोरीरोडने डांग, सापुतारा, किंवा पेठमार्गे धर्मपुर या मार्गाने पळून जात या दोघांवर गांधीधाम, अंकलेश्वर जीआयडीसी, गोदरा डाऊन पोस्ट फतेहगंज बडोदा नवरंगपुरा अहमदाबाद बारडोली सुरत राजकोट ए डिव्हिजन या पोलीस ठाण्यात सात तर कोतवाली अहिल्यानगर शहादा नंदुरबार गडक टाउन हुबळी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर यांच्याविरोधात चोरी, जबरी चोरीचे 18 गुन्हे दाखल आहेत. 5 ऑगस्ट रोजी उपनगर हद्दीत पादचारी महिलेची सोनसाखळी बळजबरीने खेचून नेल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली.ही कामगिरी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संतोष फुंदे, अंमलदार सागर परदेशी, योगेश जाधव, सागर कोळी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड, प्रमोद कासुदे यांनी केली.

Loading

Previous Post

मा. नगरसेवक निकुळे यांच्या विरुद्ध दिलेली तक्रार गैरसमजातून

Next Post

नाशिक महापालिका निवडणूक युतीमध्ये की स्वबळावर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White