• Latest
  • Trending
अल्पवयीन मुलांमध्ये राग वाढतो आहे का ?

अल्पवयीन मुलांमध्ये राग वाढतो आहे का ?

August 6, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

अल्पवयीन मुलांमध्ये राग वाढतो आहे का ?

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

किरकोळ कारणातून अल्पवयीन विद्यार्थ्यांची हत्या

नाशिक : शहरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना आता आपला मुलगा क्लासला गेल्यावर सुरक्षित परत येणार का ? ही काळजी पालकांमध्ये निर्माण झाली असून त्याला कारण देखील तसेच आहे. अगदी किरकोळ कारणातून अल्पवयीन मुलांमध्ये क्लासच्या ठिकाणी वाद झाला. आणि या हाणामारीत एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील सातपूर परिसरात एका खाजगी क्लासमध्ये बेंच पुढे घेण्याच्या कारणातून मनात राग धरून दोघा अल्पवयीन मुलांनी सायंकाळी क्लासच्या बाहेर एकटे गाठत यशराज तुकाराम गांगुर्डे (वय 16) या विद्यार्थ्यांला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत यशचा दुर्देवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार यशराज हा खाजगी क्लासमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याच्यासोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने 31 जुलै रोजी त्यास वर्गातील बेंच पुढे घेण्यास सांगितले. त्यास त्याने नकार दिला. क्लास सुटल्यानंतर रात्री नऊ वाजेच्या दरम्यान त्या मुलाने व त्याच्या मित्राने यशराज यास हाताच्या चापटीने मारहाण केली होती. तसेच 1 ऑगस्ट ला पुन्हा या दोघां मुलांनी यशराज यांच्यासोबत वाद घातला. 2 ऑगस्ट सायंकाळच्या सुमारास तो क्लासच्या बाहेर उभा असताना त्याच्यावर या दोघा मुलांनी पुन्हा हल्ला चढवत छातीत, बरगड्यांवर लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.यादरम्यान तो रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्याची बाब क्लास संचालक म्हस्के यांच्या लक्षात येताच त्यांनी यशराजला दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरानी तेथून त्यास तत्काळ पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून यशराज यास मयत घोषित केले. मात्र त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे नेमके स्पष्ट होत नव्हते. यशराजच्या मूर्तदेहावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नव्हत्या. शवविच्छेदनात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर खाजगी क्लासच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांनी केली असता त्यामध्ये मुलांच्या घोळक्यातून दोघे जण यशराजला लाथाबुक्यांनी मारताना दिसून आले. त्यानंतर तेथील पार्किंगमध्ये तो कोसळल्याचेही फुटेजमध्ये दिसत आहे. यावरुन पोलिसांनी परिसरात राहणाऱ्या दोघा अल्पवयीन बालकांना खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. रुग्णालयात आक्रोश……….अगदी किरकोळ कारणातून यशराजला आपला जीव गमवावा लागल्याने त्याच्या कुटूंबावर दुःखाचा डोगर कोसळला आहे. घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. दुपारी त्याचा मूर्तदेह ताब्यात घेण्यात आला. यावेळी आईसह कुटूंबियांनी केलेल्या आक्रोशाने रुग्णालय परिसर सुन्न झाला होता. यावेळी कुटुंबातील व्यक्तींनी पोलिसांनी त्या मुलांवर कठोर कारवाईची मागणी केली असून जरी ते अल्पवयीन असले तरी त्यांना धडा शिकवावा, जेणेकरून अन्य कोणी अल्पवयीन मुले अशा प्रकारे गुन्हेगारीकडे वळणार नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सोळा वर्षीय दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले असता न्यायमंडळाने त्यांची बाल निरीक्षणगृहामध्ये रवानगी केली आहे. याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू असून दोषारोपपत्र न्याय मंडळापुढे सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading

Previous Post

ठाकरे गटानंतर काँग्रेसला नाशिकमध्ये मोठं खिंडार?

Next Post

नाशकात मनसे-सेना बैठकीत ठाकरेंच्या नेत्यांमध्ये वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White