नाशकात महिनाभरात तीन खून, नागरिकांमध्ये दहशत

नाशिक : नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून आधी पंचवटी त्यानंतर भारत नगर आणि आता गंजमाळ परिसरात थेट घरात घुसून खून करण्यात आल्याने शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजमाळ येथील पंचशील झोपडपट्टीत राहणारा पांडुरंग उर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे (19,रा पंचशील नगर) आपल्या राहत्या घरी झोपलेला असताना तीन ते चार संशयितांनी घरात घुसून तो झोपेत असताना त्याच्यावर धारधार शस्त्राने सपासप वार करून ठार करण्यात आले.दशक्रिया विधीनिमित्ताने रात्री जागरणाचा कार्यक्रम असल्याने घरातील सर्वजण कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. मुख्य म्हणजे पांडुरंग शिंगाडे याचा भाऊ त्याच्याजवळच झोपलेला होता यादरम्यान पांडुरंग याचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आल्याने जागा झालेल्या पांडुरंग याचा भाऊ विकास याने आपल्या भावावर तिघांकडून कोयत्याने हल्ला होत असल्याचे बघून भावाला वाचवण्यासाठी विकास पुढे सरसावला मात्र हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयता उगारत मध्ये येशील तर तुलाही संपवू अशी धमकी दिली. यावेळी पांडुरंग याच्यावर वार करणाऱ्या एकाला विकासाने ओळखले असून त्याचे नाव कैलास गायकवाड असल्याचे पोलिसांना सांगितले इतर दोघेजण अनोळखी असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली असून कैलासने त्याच्या डोक्यावर, छातीवर वार केले व त्याच्या सोबत असलेल्या तिसऱ्या व्यक्तीने चॉपरने पांडुरंग याच्या बरगडीजवळ मारल्याचेही विकासाने पोलिसांना सांगितले. यादरम्यान हल्लेखोरांना पांडुरंगाच्या हल्लेखोराना ओळखले असून त्याची भाची माधुरी घराच्या दरवाजातून आत येत होती तेव्हा हल्लेखोर कैलास तिला धक्का देत मुख्य दरवाजाने तसेच अन्य दोघे घराच्या पाठीमागे असलेल्या खिडकीतून उडी मारून पळून गेले माधुरी हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ज्याच्या हातात चॉपर होते त्याचे नाव निखिल सच्चे असल्याचे सांगितले तसेच निखिल हा पांडुरंग याचा मित्र असल्याचेही तिने सांगितले म्हणजेच खून करणारे हे कधीकाळी पांडुरंग शिंगाडे याचे मित्र होते. खून झालेला पांडुरंग शिंगाडे हा सराईत गुन्हेगार शिंगाडे हा सराईत गुन्हेगार असून तो गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातून तडीपार होता त्याच्यावर दुचाकी चोरी, हाणामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.यामुळे त्याला तडीपार केले होते मात्र त्याचा मावस काका कढणे यांचा दशक्रिया विधी असल्याने पांडुरंग हा लपून रात्री पंचशील नगर मध्ये राहत्या घरी आला होता . नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्याचा भाऊ विकाससह आजूबाजूच्या नागरिकांनी पांडुरंग यास रिक्षामध्ये उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले. यादरम्यान त्याला मयत घोषित करण्यात आले. यावेळी पहाटे नातेवाईकांनी आक्रोश करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका घेतली यामुळे गोंधळ निर्माण झाला मात्र पोलिसांनी आरोपींना अटकेचे आश्वासन दिले तरी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. पांडुरंग शिंगाडे याचा भाऊ विकास यांने भद्रकाली पोलीस ठाण्यात भावाचा खून झाल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार केले असल्याचे समजते.


![]()











