• Latest
  • Trending

नाशकात “माधव” पॅटर्न चा फटका बसणार कोणाला ?

May 3, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात “माधव” पॅटर्न चा फटका बसणार कोणाला ?

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाशिक :लोकसभेचे रणशिंग फुंकले गेले. आणि नाशिक लोकसभेत रोज उलट-फेर बघायला मिळत होते. सुरवातीला हेमंत गोडसे यांची उमेदवारी नाशिक लोकसभेसाठी पक्की मानली जात असताना, मंत्री छगन भुजबळ यांचे नाव अचानक पुढे आले मात्र भुजबळांचे नाव स्थानिक भाजपा नेत्यांनी नव्हे तर केंद्राच्या नेत्यांनी पुढे आणल्याचे भुजबळ यांनी मीडियाला सांगितले.अमित शहा यांनीच आपले नाव सुचवल्याचे भुजबळ म्हणाले अचानक भुजबळ यांचे नाव पुढे आणण्यात नक्कीच भाजपाची रणनीती असणार यामागे माधव ही त्रिसूत्री काम करणार असल्याची चर्चा होती. “माधव” म्हणजे (मा म्हणजे माळी +ध म्हणजे धनगर+ व म्हणजे वंजारी) असे समीकरण होते. मुख्य म्हणजे हे समीकरण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने राबवले सुद्धा मात्र नाशिक येता-येता “माधव” समीकरणाला मोठा धक्का बसला.बीड मध्ये पंकजा मुंडे आणि परभणीत महादेव जानकर यांना भाजपाने मैदानात उतरवले. पण नाशकात पक्षीय समीकरणे अडचणीचे ठरले. यामुळे छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळू शकली नाही. भाजपासाठी माधव समीकरण नवे नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवत यांनी राज्यात माधव पॅटर्न साठी पुढाकार घेतला आणि बहुजन समाजातील वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र आणण्यात ते यशस्वी झाले. वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे, धनगर समाजाचे अण्णा डांगे, माळी समाजाचे ना. स. फरांदे हे नेतृत्व पुढे आले आणि पुढे भाजपा हा ओबीसींचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आणि महाराष्ट्राची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आली यानंतर सुद्धा पंकजा मुंडे, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे यासारखे दिगग्ज ओबीसी नेते तयार झालेत. मात्र आज नाशिकमध्ये “मा” ला न्याय न मिळाल्याने महाराष्ट्रातील त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील माळी समाजात प्रचंड अस्वस्थता दिसत आहे. मतांच्या गोळा बेरजेसाठी भुजबळांसारख्या ओबीसी नेत्यांचा वापर गेला गेल्याचा राग ओबीसी समाजात आहे. छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर राज्यातील ओबीसी समाजात प्रचंड आक्रोश असल्याचे समजते. अनेक ठिकाणी मेळावे, बैठका देखील घेण्यात आल्या. त्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघात माळी समाजाचे मतदान 1 लाख 40 हजार इतके असल्याची माहिती मिळते आहे. तर ओबीसी समाजाचे मतदान हे निर्णायक ठरणार आहे. महायुतीला “माधव” समीकरण राखण्यात यश येईल अथवा हे मतदान महाआघाडीच्या पारड्यात पडते ते निकालाच्या दिवशीच कळेल.

Loading

Previous Post

नाशिकच्या महायुतीच्या रॅलीत मनसे-मनसे हेमंत गोडसेच्या घोषणा

Next Post

महायुती व महाआघाडीला आता टेन्शन बंडखोरांच ! फटका बसणार कोणाला ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White