पार्किंगच्या वादातून भर रस्त्यावर हातात काठ्यात फिरवत धुडगूस

नाशिक : पार्किंग वरून किरकोळ वाद झाला आणि काही मिनिटातच हातात लाकडी दांडके घेऊन रस्त्यावर धुडगूस घालण्यात आला. नागरिकांना शिवीगाळ,जीवे ठार मारण्याच्या धमक्या यामुळे सिडकोतील उत्तम नगर परिसरात रात्रीच्या सुमारास दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या प्रकाराचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच अंबड पोलिसांनी या गावगुंडांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पार्किंगच्या कारणावरून झालेल्या बाचाबाची नंतर काही युवक हातात लाकडी दांडके घेऊन मुख्य रस्त्यावर आले. या दरम्यान परिसरात इजा करणाऱ्या नागरिकांना थांबवत शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. हातात काठ्या असल्याने भीतीपोटी कोणीही नागरिक त्यांना रोखण्यासाठी पुढे आले नाही. मात्र वाहने थांबून नागरिक त्यांची दहशत खुलेआम पाहत होते. त्यांच्या दहशतीमुळे वाहनधारक जागीच थांबून गेले होते कारण हे तिघेही टवाळखोर आवाज देत हातातील दंडके हवेत फिरून भाईगिरी दाखवीत होते. या घटनेची माहिती मिळताच गस्तीवरील अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले यामध्ये गणेश भागवत पाटील, शुभम बाळू सुतार, कृष्णा बाळू सुतार अशी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहेत सिडको बनत चालला आहे भाईगिरी चा अड्डा सिडको परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होण्याचे प्रकार हा चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. रस्त्यावरून जाणे येणे किंवा खुन्नस देणे यासारख्या किरकोळ कारणांवरून वाद उफाळून येत असून हातात काठ्या दांडके घेऊन दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढत चालले आहे. मारहाण हल्ले आणि वाहनांची तोडफोड यासारख्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

![]()












