येत्या 6 आठवड्यात महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची पदे भरा

नाशिक : महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची पदे येत्या सहा आठवड्यात भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हे आदेश दिलेत. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र अद्याप नियुक्तया झालेल्या नसल्याने न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केल. निवडणूक होऊन बराच कालावधी उलटला असताना आणखीन चार महिन्याची मुदत कशासाठी असा सवाल न्यायालयाने उपस्थित केल्याची माहिती आहे. मनपाच्या कारभाराबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या आदेशामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या 10 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. काँग्रेसचे गटनेते सुपी जीन यांनी नियुक्तीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेमुळे या प्रकरणाला न्यायालयीन वळण मिळाले. आता न्यायालयाच्या स्पष्ट आदेशामुळे प्रशासनाला नियुक्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी लागणार आहे

![]()












