• Latest
  • Trending
नाशिकमध्ये धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल ! 

नाशिकमध्ये धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल ! 

October 5, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल ! 

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

  धर्मांतराच्या दबावासह लैंगिक शोषणाचा आरोप

नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा ) महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत नाशिक शहरात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचे अल्पवयीन असल्यापासून लैंगिक शोषण करणे, अश्लील फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणे, तसेच लग्नासाठी धर्मांतराचा दबाव टाकल्याच्या आरोपावरून अमन अफसर खान याच्याविरोधात गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, २०२१ मध्ये ती अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. त्यावेळी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची आरोपीशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर आरोपी तिच्या नियमित संपर्कात राहू लागला आणि दोघांच्या भेटीगाठीही वाढल्या. याच काळात पीडितेच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे ती मानसिकदृष्ट्या खचलेली असताना आरोपीने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, ती १६ वर्षांची असताना आरोपीने तिला नाशिकमधील एका लॉजवर नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतरही लग्नाचे आश्वासन देत आरोपीने तिचे शोषण सुरू ठेवल्याचा आरोप आहे. ‘मी तुला सोडणार नाही, तुला पत्नी मानले आहे,’ असे सांगून आरोपीने तिचा विश्वास संपादन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.पीडिता १८ वर्षांची झाल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, लग्न करायचे असल्यास तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी धर्मांतर करावे लागेल, अशी अट आरोपीने घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर पीडितेवर विशिष्ट पद्धतीने राहण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच बुरखा घालण्याची सक्ती करण्यात आली आणि परपुरुषांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पीडितेने आरोपीवर अश्लील फोटो आणि व्हिडिओचा वापर करून तिला ब्लॅकमेल केल्याचाही आरोप केला आहे.त्याचबरोबर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हे फोटो-व्हिडिओ डिलीट करण्यासाठी आरोपीने ५ लाख रुपयांची मागणी करत सातत्याने तिला ब्लॅकमेल केलं. पीडितेने आरोपीसोबतचे सर्व संबंध तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपीने सतत फोन करून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला या माध्यमातून तिच्यावर दबाव कायम ठेवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २५ जून २०२५ रोजी आरोपीने तिला जबरदस्तीने भेटीसाठी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी त्याने पुन्हा एकदा पैशांची मागणी करत गंभीर परिणाम भोगावे लागतील या संपूर्ण प्रकारामुळे पीडितेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार भद्रकाली पोलिसांनी अमन अफसर खान याच्याविरोधात विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

Loading

Previous Post

नाशिकच्या सिडकोत गावगुंडांचा कायद्याला ठेंगा

Next Post

स्वीकृत साठी भाजपमधून 300 नावे वरिष्ठांकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White