मातोश्रीवर नगरसेवकांची एक निष्ठेची शपथ

नाशिक : शिंदे गटाच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेने आपला मोर्चा नाशिक महानगरपालिकाकडे वळवला यादरम्यान 15 पैकी 12 नगरसेवक शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्याने ठाकरे गटाचे वरीष्ठ नेते अॅक्टिव्ह मोडवर आले.या सर्व चर्चांना बुधवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर मातोश्री वरुण व 15 नगरसेवकांना हजर होण्याचे आदेश आल्यानंतर सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने मातोश्रीवर हजर झाले. नाशिकच्या नगरसेवकांशी तासभर चर्चा
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवक व प्रमुख यांच्याबरोबर सुमारे तासभर सविस्तर चर्चा केली. बैठकीला जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख गिते, गटनेते केशव पोरजे यांच्यासह १४ नगरसेवक उपस्थित होते. नगरसेविका मंगला आढाव प्रकृती अस्वास्थामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने पुत्र रोशन आढाव बैठकीला उपस्थित होते.यावेळी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर व माजी खासदार विनायक राऊत हेही बैठकीला उपस्थित होते. नगरसेवकांनी, ‘आम्ही पक्षाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहोत, एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका पक्षप्रमुखांसमोर मांडली. प्रत्येक नगरसेवकाशी स्वतंत्र संवाद साधून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना व राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. उपमहापौरपद आणि पाच कोटींच्या आमिषाबाबत नगरसेवकांनी माहिती दिली. हा प्रकार गंभीर असून, कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडू नका, असा सल्ला ठाकरे यांनी दिल्याचे समजते. त्याचबरोबर मातोश्री बंगल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर एकनिष्ठतेची शपथ घेतली. एकनिष्ठ राहिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत पक्षाची साथ सोडू नका, असा संदेश उद्धव ठाकरे नगरसेवकांना दिला. मुंबई मनपा प्रमाणेच नाशिकमध्येही निधी देताना अन्याय केला जातो त्यामुळे न्यायालयात याचिका का दाखल करण्यावरही चर्चा झाल्याचे समजते. त्याचबरोबर आगामी सिंहस्थ कुंभमेळा शहरातील राजकीय परिस्थिती आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर उद्धव ठाकरे लवकरच नाशिकचा दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे

![]()












