• Latest
  • Trending
धर्मांतर प्रकरणात थेट मालेगाव ते मलेशिया कनेक्शन

धर्मपरिवर्तनाच्या कटात निदा खानचा सहभाग उघड

May 7, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

धर्मपरिवर्तनाच्या कटात निदा खानचा सहभाग उघड

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

निदा खान सध्या फरार असून पोलीस तिचा राज्यभर शोध घेत आहेत.

नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित ‘TCS’ कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. बहुचर्चित ‘TCS’ कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान  हिच्याकडेच धर्मांतर घडवून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. निदा खान सध्या फरार असून पोलीस तिचा राज्यभर शोध घेत आहेत. मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये निदा खान ही ‘वॉन्टेड’ आरोपी आहे. टीसीएसमधील एका पुरुष कर्मचाऱ्यासह महिला कर्मचाऱ्याचे धर्मांतर करण्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. धार्मिक भावना दुखावणे, गुंगीकारक औषधे देऊन अत्याचार करणे आणि पीडितांना धमकावणे अशा गंभीर आरोपांची टांगती तलवार निदावर आहे. एसआयटीला  मिळालेल्या पुराव्यांनुसार, निदा केवळ या कटात सहभागी नव्हती, तर तिला विशिष्ट टार्गेट देण्यात आले होते. 2 एप्रिल रोजी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत संशयित तौसिफ अत्तर, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, या चौघांचा सहभाग निष्पन्न झाला होता. त्यांना पोलिसांनी अटक करून बारा ते पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती या दरम्यान पोलिसांकडून झालेल्या तपासात या चौघांसह निदा खान हिने सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा पूर्वनियोजित कटात सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. फिर्यादी पुरुष कर्मचारी व आणखीन एका महिला कर्मचाऱ्यांचा धर्म परिवर्तन करण्यासाठीचा कट रचण्यात आला होता. या कटात निदा खान हिच्याकडे महिलेचा धर्म परिवर्तन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. निवेदन पंचनाम्यात निदा हिचा सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी या गुन्ह्यातही तिला आरोपी केले असून आता या गुन्ह्यात सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे. अटकपूर्व जामीन फेटाळला                   
निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि प्राप्त झालेले पुरावे लक्षात घेता न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. जामीन फेटाळल्यापासून निदा खान फरार असून, नाशिक पोलिसांची विशेष पथके राज्यभर तिचा शोध घेत आहेत. मोठ्या रॅकेटचा खुलासा होण्याची शक्यता
2 एप्रिल रोजी एका पुरुष कर्मचाऱ्याने मुंबई नाका पोलिसात फिर्याद दिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. तपासादरम्यान तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या चौघांना अटक करण्यात आली होती. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, निदा खान हिच्या अटकेनंतर या प्रकरणात आंतरराष्ट्रीय धागेदोरे किंवा मोठ्या रॅकेटचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Loading

Previous Post

आया-बहिणींचे कपडे फाडून रिंग रोडची जागा अधिग्रहीत करणार असाल तर….. 

Next Post

देशहितासाठी, इंधन गरजेनुसार वापरा आणि वर्षभर सोनं खरेदी करू नका – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White