• Latest
  • Trending
धर्मांतर प्रकरणात थेट मालेगाव ते मलेशिया कनेक्शन

धर्मांतर प्रकरणात थेट मालेगाव ते मलेशिया कनेक्शन

April 28, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

धर्मांतर प्रकरणात थेट मालेगाव ते मलेशिया कनेक्शन

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती उघडकीस

नाशिक : येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आणखी काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाला आता आणखी धक्कादायक वळण लागण्याची शक्यता असून प्रकरणाचे धागेदोरे थेट मलेशिया आणि मालेगावपर्यंत पोहोचले असल्याचा धक्कादायक खुलासा विशेष सरकारी सरकारी वकील अजय मिसर यांनी केला. निदा खानने पीडित मुलीचे धर्मांतर करण्यासाठी कशा प्रकारे जाळे विणले होते, याचे एकामागून एक  पुरावे कोर्टासमोर ठेवले. या प्रकरणातील दुसरा आरोपी दानिश शेख याने पीडितेची शैक्षणिक आणि महत्त्वाची कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली होती. ही कागदपत्रे मालेगाव येथील एका पार्टीकडे देऊन पीडितेच्या नावात बदल केला जाणार होता. तसेच पीडितेला मलेशिया येथे नोकरीसाठी इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पाठवण्याची तयारीही सुरू होती. या संपूर्ण कटासाठी निदा खानला कोणी आर्थिक मदत केली का, यामागे काही देशविघातक शक्ती आहेत का, याचा तपास करणे अद्याप बाकी असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले धर्मांतराचे प्रशिक्षण आणि ‘हनिया’ नाव
सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले की, निदा खान आणि इतर आरोपींनी पीडित महिलेचे धर्मांतर करण्यासाठी तिला बुरखा दिला होता. इतकेच नाही तर  पीडितेला मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र जीवन हे पुस्तक आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त करणाऱ्या सोशल मीडिया लिंक्स पुरवण्यात आल्या.  इस्लाम धर्माची माहिती देणारी पुस्तके आणि मोबाईलमध्ये धार्मिक शिकवण देणारी ॲप्लिकेशन्स डाऊनलोड करून दिली होती. संशयितांनी  पीडित तरुणीचे नाव बदलून ‘हानिया’ असे केल्याचे उघड झाले आहे. 2 मे रोजी होणार फैसला–  विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, निदा खान सध्या फरार असून तिचा मोबाईल जप्त करणे आणि तिने आणखी किती मुलींसोबत असे प्रकार केले आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे. जर तिला जामीन मिळाला, तर ती साक्षीदारांवर दबाव आणू शकते. सध्या न्यायालयाने निदा खानला कोणतेही संरक्षण दिलेले नाही, त्यामुळे पोलीस तिला कधीही अटक करू शकतात. या सर्व युक्तीवादानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असून, येत्या 2 मे रोजी यावर अंतिम निकाल दिला जाणार आहे. सरकारी वकील म्हणून आता अॅड. मिसर– टीसीएसप्रकरणी सरकारी अभियोक्ता म्हणून किरण बेंडभर या पहिल्या सुनावणीपासून एसआयटी, तसेच सरकार पक्षाची बाजू मांडत होत्या; परंतु आता ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सोमवारी पहिल्यांदाच या प्रकरणात बाजू मांडली. या प्रकरणातील दुसरा संशयित दानिश शेख याने दाखल केलेला जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने बाद ठरविला. दानिश सध्या कोठडीत आहे.

Loading

Previous Post

नाशिकहून परभणीत गेला अन् उन्हाने जीव घेतला ! 

Next Post

नाशकात आंघोळीचा साबण खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White