तत्काळ 1930 क्रमां का शी संपर्क साधा

नाशिक : देशाच्या कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे कुणालाही डिजिटली अटक करता येत नाही. असा कोणताही फोन किंवा व्हिडिओ कॉल आल्यास तो १००% फ्रॉड आहे हे ओळखा,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सायबर भामट्यांबाबत माहिती दिली. विधानसभेत प्रश्न उत्तराच्या तासात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी डिजिटल रेस्ट आणि ऑनलाइन फसवणुकी द्वारे होणारी लूट रोखण्याचा मुद्दा उपस्थित केला अशी फसवणूक रोखण्यासाठी कृतीदल स्थापन करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणीस म्हणाले
“कोणत्याही कायद्यान्वये कोणीही कोणाला डिजिटल अरेस्ट करू शकत नाही. तुम्हाला एक फोन येतो, व्हिडिओ कॉल येतो, त्यावर समोर बसलेला माणूस स्वतःला सीबीआयचा, पोलिसांचा अधिकारी सांगतो. मग तिथून तो म्हणतो की तुम्ही पार्सल मागवलं होतं का? त्यात ड्रग्स सापडले आहेत. तुम्हाला जागचं हलण्यासही परवानगी दिली जात नाही. तुम्हाला स्क्रीनपुढेच राहायला सांगितलं जातं. त्यातून सुटण्याकरता तुम्हाला पैसे पाठवण्याची मागणी केली जाते. मग सामान्य माणूस घाबरून पैसे ट्रान्स्फर करतो”, अशी प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल अरेस्टची सांगितली.
डिजिटल अरेस्ट प्रकरणात फक्त सामान्य माणूस नाहीतर अनेक मोठे अधिकाही, निवृत्त अधिकारीही अडकले जातात, असंही फडणवीस म्हणाले. “पीडितांनी पैसे पाठवले की ते पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये तत्काळ ट्रान्सफर केले जातात, मग ते विदेशातील खात्यांतही पाठवले जातात. अनेक प्रकरणात असं लक्षात आलंय की पूर्ण ऑपरेशन विदेशातून होतं”, असंही ते म्हणाले. तात्काळ 1930 क्रमांकाशी संपर्क साधा– कुणालाही डिजिटल अरेस्ट संदर्भात कॉल आले असतो फसवा आहे हे समजा आणि त्या क्षणी 19 30 या क्रमांकावर कॉल करा हा सायबर चा नंबर असून त्यामागे प्रचंड मोठी व्यवस्था उभी आहे त्याचबरोबर कोणी घाबरून पैसे दिले असेल आणि लगेच 19 30 या क्रमांकावर सांगितले तर गोल्डन ओव्हर मध्ये तात्काळ हे पैसे थांबू शकतो अशी आपल्याकडे व्यवस्था आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

![]()












