
नाशिक : पंचवटी गोळीबार प्रकरणात अटकेत असलेले भाजपचे माजी नगरसेवक संशयित जगदीश पाटील यांना उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला. गोळीबार प्रकरणात मुख्य संशयित म्हणून पाटील यांना मागच्या वर्षी 21 सप्टेंबर रोजी पंचवटी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सराईत गुन्हेगारांसोबत संगणमताने कट रचून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यामध्ये त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने पहिल्यांदा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तेव्हापासून ते जामिनासाठी प्रयत्न करत होते. त्यांचा जामीन अर्ज हा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांच्या वकिलानमार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मागील सहा महिन्यांपासून पाटील हे मध्यवर्ती कारागृहात होते. अखेर जामीन मंजूर झाल्याने आता त्यांचा कारागृहातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

![]()












