नासिक महानगरपालिकेवर भगवा फडकणार मंत्री दादा भुसे

नाशिक : शहरातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये राजीव नगर येथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जल्लोषात करण्यात आले याप्रसंगी बोलताना दादा भुसे म्हणाले नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा मजबूत बालेकिल्ला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी शिवसेना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नासिक महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवेल याबाबत कोणतीही शंका नाही असेही भुसे म्हणाले याप्रसंगी प्रभाग क्रमांक 30 मधील शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार सौ श्वेता प्रमोद लासुरे (भटमुळे ), सौ पद्मिनी प्रवीण वारे, सौ योगिता धीरज भोसले, श्री सागर सतीश देशमुख यांच्यासह शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी व परिसरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


![]()















