भाजप आमदारांमध्ये नाराजीचा सूर

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीतून आमदार देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिंक्य फरांदे व आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी बेंडाळे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. याला कारण म्हणजे मनपा निवडणुकांमध्ये आमदार खासदार मंत्र्यांच्या मुलांना उमेदवारी देणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यामुळे नाशिक मधील आमदारांच्या मुलांना माघार घ्यावी लागली होती अनेक दिवसांपासून आमदार हिरे यांची कन्या रश्मी बेंडाळे आणि आमदार देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिंक्य फरांदे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती यासाठी प्रचाराला सुरुवात करत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच दोघांनीही अर्ज भरला होता. परंतु फडणवीसांचे आदेश आल्यानंतर बेंडाळे आणि फरांदे यांना माघार घ्यावी लागली. मात्र जळगाव मध्ये भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने भाजपा आमदारांमध्ये असंतोष पसरला आहे. जळगावला वेगळा न्याय आणि नाशिकला वेगळा न्याय का ? असा सवाल करीत भाजपच्या नाराज आमदारांनी भाजप कार्यालयापासून आंतर राखल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार जळगावात आमदार राजू मामा भोळे यांचे पुत्र विशाल भोळे यांना प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी दिली आणि त्यांना बिनविरोध निवडून देखील आणण्यात आले. मात्र नाशिक मध्ये आमदारांच्या मुलांना उमेदवारी नाकारताना जळगाव मध्ये मात्र आमदार पुत्राला उमेदवारी देऊन निवडून आणले गेले त्यामुळे पक्षाकडून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे आमदारांनी प्रचारापासून आंतर राखल्याची चर्चा सुरू आहे भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी शहरातील तीनही आमदार अनुपस्थित असल्याने नाराजीच्या चर्चांना सुरू आहेत. महापालिका निवडणुकीत आधीच तिकीट वाटपात आमदारांना दुय्यम स्थान मिळाल्याने नाराजी होती. त्यातच नाशिकला वेगळा न्याय आणि जळगावला वेगळा न्याय म्हणत आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

![]()















