• Latest
  • Trending
नाशकात शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुक उमेदवाराचा आत्महत्येचा इशारा

नाशकात शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुक उमेदवाराचा आत्महत्येचा इशारा

January 3, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुक उमेदवाराचा आत्महत्येचा इशारा

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

राजकीय क्षेत्रात खळबळ

नाशिक : शहरात आता भाजपा नंतर शिंदे गटाच्या शिवसेनेत उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात वाद उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे.प्रभाग क्रमांक 31 मधील इच्छुक उमेदवार शिवा तेलंग यांनी पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शिवा तेलंग यांनी सोशल मीडियावर एक दीर्घ पत्र पोस्ट करत थेट पक्षातील काही स्थानिक प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवा तेलंग यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, 2022 साली त्यांनी आणि त्यांची पत्नी पूजा तेलंग यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून प्रभाग क्रमांक 31 मध्ये पक्षाच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत अनेक कार्यक्रम, विकासकामे आणि पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. मात्र माजी नगरसेवक ढेमसे यांनी आपला केवळ राजकीय वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर पक्षप्रवेशाच्या वेळी मोठ्या निधीची कमिटमेंट करण्यात आली होती. प्रभागात तब्बल 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, मात्र प्रत्यक्षात फक्त भूमिपूजन झाले, कामे कुठेच झाली नाहीत. आलेला निधी नेमका कुठे गेला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. माजी नगरसेवकांच्या माध्यमातून निधी आणल्याचा दावा करण्यात आला, मात्र प्रत्यक्ष कामे कुठेच न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, प्रभागात एकाच वेळी दोन जणांना एबी फॉर्म देण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला पुरस्कृत करण्याचे आदेश दिले असतानाही ते अमलात न आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सगळी माहिती दिल्यानंतरही स्थानिक पातळीवर निर्णय बदलण्यात आल्याने आपला विश्वासघात झाल्याची भावना शिवा तेलंग यांनी व्यक्त केली आहे.29 तारखेला रात्री कॅनडा कॉर्नर येथे एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवा तेलंग यांनी केला आहे.एबी फॉर्म मिळवण्यासाठी पैसे मागितल्याचा आणि पैसे देऊन फॉर्म घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पत्राच्या शेवटी शिवा तेलंग यांनी अत्यंत गंभीर इशारा देत आपल्या संभाव्य आत्महत्येस स्थानिक वरिष्ठ नेते जबाबदार राहतील, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. “मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे,” असे नमूद करत त्यांनी पत्नी व मुलांना न्याय देण्याची विनंती नागरिकांना केली आहे. दरम्यान, हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवा तेलंग हे ‘नॉट रिचेबल’ असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील तिकीट वाटपाची पद्धत आणि आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घटनेची दखल घेतील का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे

Loading

Previous Post

हर्षा बडगुजर यांची माघार मात्र शहाणे अडचणीत !

Next Post

जळगाव आणि नाशिकला वेगळा न्याय का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White