• Latest
  • Trending
नाशकातील भाजप आमदाराला मारण्याची माजी नगरसेवकाकडून सुपारी

नाशकात बंडखोरांना रोखण्यासाठी भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू

January 2, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात बंडखोरांना रोखण्यासाठी भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू

YOU MAY ALSO LIKE

प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

नाशकात अनेक ठिकाणी दोन मित्रांमध्येच कुस्ती

मंत्री गिरीश महाजन तळ ठोकून

नाशिक : भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठा गोंधळ झाल्याने निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसू नये यासाठी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न रात्रीपासून सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. पंचवटी सिडको नाशिक रोड परिसरातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली यामध्ये शहराध्यक्ष यांना गाजर दाखवत घेराव देखील घालण्यात आला होता. त्याचबरोबर ज्या इच्छुक उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली नसल्याने ते अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. याचा फटका निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता लक्षात घेता पक्षातील बंडखोरी शांत करण्यासाठी व नाराज असणार्‍यांची समजूत घालण्यासाठी स्वतः मंत्री गिरीश महाजन मैदानात उतरले असल्याची माहिती मिळत असून यासाठी ते रात्रीपासून नाशिक शहरात मुक्काम ठोकून आहेत. यामध्ये त्यांनी काही नाराज नेत्यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा देखील प्रयत्न केल्याचे समजते. यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती समजले जाणारे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला तर सुधाकर बडगुजर यांच्या घरातील तीन सदस्यांना उमेदवारी मिळाली. मुकेश शहाणे यांच्या आधी नेते सुधाकर बडगुजर यांचा पुत्र दीपक बडगुजर यांनी अर्ज भरल्यामुळे एबी फॉर्म असूनही मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्याचप्रमाणे सिडको परिसरातील दोन नगरसेवकांचा अर्ज देखील बात करण्यात आला आहे त्यामुळे माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद ठरल्याने भाजपच्या गोटात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. हीच नाराजी आज शमवण्याचे प्रयत्न मंत्री गिरीश महाजन करणार असून यामध्ये एका जागेवर सुधाकर बडगुजर यांची माघार होण्याची शक्यता असून या ठिकाणी मुकेश शहाणे यांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पक्षाला फटका बसू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन काही निष्ठावंतांच्या घरी देखील जाणार असल्याची माहिती मिळत आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या या दौऱ्यामुळे भाजपच्या अंतर्गत घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला असून वरिष्ठ स्तरावरून देखील बंडखोरी थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Loading

Previous Post

नासिक मध्ये भाजप निष्ठावंतांचा आक्रोश

Next Post

हर्षा बडगुजर यांची माघार मात्र शहाणे अडचणीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White