• Latest
  • Trending
नाशिकचं राजकारण फिरलं ! महायुती फुटली तर  महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब

नाशिकचं राजकारण फिरलं ! महायुती फुटली तर महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब

December 29, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकचं राजकारण फिरलं ! महायुती फुटली तर महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशकात भाजप लढणार स्वबळावर

नाशिक : शहरातील महानगर पालिकेच्या निवडणुकीचे वारे आता वेगळ्याच दिशेने वाहू लागले आहेत. महायुती मध्ये फाटाफूट झाली असून भाजप स्वबळावर लढणार आहे. तर शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी एकत्रित महापालिकेच्या निवडणूकांना सामोरे जाणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत वर शिक्कामोर्तब झाले असून या आघाडीत मनसेच्या रूपाने नवा भिडू आला आहे.नाशिकमध्ये महायुतीने एकत्रित निवडणूक लढवावी असा प्रयत्न सुरू होता. परंतु भाजपा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला कमी जागा देत होते.महायुतीतील बैठकांमध्ये भाजपा ८२, अजित पवारांची राष्ट्रवादी 6 तर शिंदे गटाची शिवसेना 35 असा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे समजते. परंतु त्यावर एकमत न झाल्याने त्यामुळे जागावाटपावरून या तिन्ही पक्षात एकमत झाले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन,मंत्री दादा भुसे,समीर भुजबळ, प्रवीण तीदमे, नरहरी झिरवाळ,रंजन ठाकरे यांच्या बैठका सुरू होत्या. मात्र जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता त्यामुळे अखेर महायुतीत फुट पडली. मिळालेल्या माहितीनुसार युतीत शिंदे गटाची शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे. साधारण ९० जागा शिंदे गटाची शिवसेना लढवणार आहे. तर ३० जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मिळणार आहेत. यासाठी भुजबळ फार्मवर रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होत्या अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाची शिवसेना शरद पवार गटाची राष्ट्रवादी,काँग्रेस,महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहेत. त्याचबरोबर भाजपचा पराभव करण्यासाठी इतर घटक पक्ष देखील विकास आघाडीत सामील होणार आहेत यामध्ये शरद पवार गटाला जागा वाढवून दिल्याचे समजते. इतर घटक पक्ष एकत्र आणण्यामागे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांची भूमिका महत्वाची ठरल्याचे समजते. या घटनांमुळे नाशिक महापालिकेची निवडणूक तिरंगी होणार असल्याचे चित्र आहे.

Loading

Previous Post

भुजबळांचे कट्टर समर्थक शिंदे गटाच्या गोटात

Next Post

नाशकात भाजपचा घराणेशाहीला ब्रेक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White