भाजपचा एकाचवेळी ठाकरे गटाच्या शिवसेनेला व कॉग्रेसला

नाशिक : शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ होत असून नाशिकचे दोन माजी महापौर आणि कॉग्रेस पक्षाचे दिगग्ज नेते भाजपच्या गळाला लागले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या पक्षाची युतीची घोषणा होत असताना जल्लोषात सामील झालेला नेता आता भाजपात जाणार या चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगल्या. नाशिकचे दोन माजी महापौर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले विनायक पांडे यांच्यासह माजी महापौर असलेले यतिन वाघ हे भाजपच्या गळाला लागले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असून, यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.विनायक पांडे हे ठाकरे गटाचे अत्यंत विश्वासू आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जात होते. ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा झाल्यानंतर जल्लोषात सहभागी झालेले पांडे थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांच्यासोबतच यतिन वाघ हे देखील भाजपमध्ये जाणार आहेत. दुसरीकडे, काँग्रेसचे नाशिकमधील बडे नाव असलेले शाहू खैरे भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. खैरे यांच्यासारखा अनुभवी चेहरा भाजपमध्ये गेल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपची ताकद शहरात अधिक वाढणार असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

![]()












