शिंदे गटाची शिवसेना ठरला सर्वात मोठा पक्ष

नाशिक : नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला असून 11 पैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आलेला नाही. या सर्व 11 जागांवर शिवसेना,(शिंदे गट) भाजप आणि राष्ट्रवादी(अजित पवार) च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 11 पैकी 11 जागांचा निकाल लागला आहे.एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 11 पैकी 5 जागांवर शिंदें गटाच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी असून या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 3 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. 11 पैकी एकही नगराध्यक्ष पदाची जागा महाविकास आघाडीला जिंकता आलेली नाही. नाशिक जिल्हा 11 नगर परिषदेचा निकाल
भगूर – अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
येवला – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी विजयी
सिन्नर – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले विजयी
नांदगाव –शिंदे गटाच्या शिवसेनेचे सागर हिरे विजयी
इगतपुरी –शिंदे गटाच्या शिवसेनेच्या शालिनी खातळे विजयी
सटाणा – शिंदे गटाच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील विजयी
त्र्यंबकेश्वर –शिंदे गटाच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार विजयी
मनमाड – शिंदे गटाच्या शिवसेनेचे योगेश पाटील विजयी
चांदवड – भाजपचे वैभव बागुल विजयी
पिंपळगाव बसवंत – भाजपचे डॉ. मनोज बर्डे विजयी
ओझर – भाजपच्या अनिता घेगडमल विजयी कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष ?
एकूण नगराध्यक्षपदं – 11
भाजप – 3
शिवसेना – 5
राष्ट्रवादी – 3
काँग्रेस – 0
शिवसेना ठाकरे गट – 0
राष्ट्रवादी शरद पवार – 0


![]()















