सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रशासनात मोठी उलथापालथ

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली होऊन आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्रात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून नाशिकसह रत्नागिरी, जळगाव, पुणे जिल्ह्यांतील प्रशासनात फेरबदल करण्यात आले आहेत.जलज शर्मा यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार काढून घेत त्यांच्याकडे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्य म्हणजे आयुष प्रसाद हे जळगावचे जिल्हाधिकारी होते.आणि नाशकात कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन हे काम बघत आहेत.यामध्ये प्रशासकीय हस्तक्षेप टाळण्यासाठीच जिल्हाधिकारी सुद्दा त्यांनी त्यांच्या जळगाव जिल्ह्यातून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे महायुतीतील मित्र पक्षच एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

![]()












