• Latest
  • Trending
नाशिकचं राजकारण पेटलंय ?

नाशिकचं राजकारण पेटलंय ?

June 4, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकचं राजकारण पेटलंय ?

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

दोन मोठी लग्नसमारंभ, मुख्यमंत्री भेट आणि आज हकालपट्टी

नाशिक : शहरात दोन विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाशकात आले, या विवाहसोहळ्याला वऱ्हाडी मंडळी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. मात्र या विवाह सोहळ्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात फटाके वाजले तर एका प्रमुख पक्षात मोठे स्फोट झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे पुतणे आणि माजी आमदार शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांच्या विवाह सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आले असताना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मुख्य म्हणजे त्यावेळी ठाकरे गटाचे फायर ब्रॅन्ड नेते संजय राऊत नाशकात होते.तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यासाठी सोमवारी सायंकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. याआधी सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे लग्न सोहळ्याला दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी वधू-वराला शुभेच्छा दिल्या. यानंतर एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांच्याबाबत सूचक वक्तव्य केले. शिंदे शेवटी शिंदेंकडे येणार नाही तर कुठे जाणार? विलास शिंदे हा आमचा जुना कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. हे मंगल कार्य आहे. त्यामुळे मी इथे राजकीय गणित मांडणार नाही, असे त्यांनी म्हटले. आता एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.

तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर म्हणाले आपण म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो मात्र बडगुजर म्हणाले मी नाराज नाही पण स्वतावर नाराज आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावा देखील बडगुजर यांनी केला. त्यानंतर मात्र आज ठाकरे गटाच्या शिवसेनेने पत्रकार परिषद घेत चक्क सुधाकर बडगुजर यांनाच धक्का दिला. दरम्यान, ही पत्रकार परिषद सुरु असतानाच संजय राऊत यांचा माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यानं हकालपट्टी केल्याची घोषणा यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुख्य म्हणजे सुधाकर बडगुजर पत्रकार परिषदेला गैरहजर होते तर महानगर प्रमुख विलास शिंदे हे मात्र उपस्थित होते. यावर प्रतिक्रिया देताना सुधाकर बडगुजर म्हणाले पक्षात नाराजी व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही, पक्षाने जी कारवाई केली आहे त्यावर मी योग्य वेळी उत्तर देईन. आज पक्षाने पत्रकार परिषदेचा आयोजन केलं होतं पण मी नाशिक बाहेर असल्याने या पत्रकार परिषदेला गेलो नाही. त्याबाबत मी जिल्हाध्यक्षांना कळवलं होतं. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणून जर माझ्यावर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे. तर दुसरीकडे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका बघता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विवाह सोहळ्याच्या आडून मोठी खेळी तर खेळली नाही ना याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नेमके सुधाकर बडगुजर आहेत कोण ? बडगुजर हा ठाकरे गटाचा मोठा चेहरा म्हणून शहरात ओळख त्याचबरोबर संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळख 2007 सालापासून राजकीय कारकिर्दीला सुरवात, सुरवातीला अपक्ष नगरसेवक, या अपक्षांच्या पाठींब्यावर शिवसेनेच्या महापौरपदी विनायक पांडे विराजमान, 2008 साली शिवसेनेत प्रवेश त्यानंतर सलग तीन वर्षे सभागृह नेतेपदी विराजमान त्यानंतर मनसे सत्तेत असताना सलग तीन वर्षे विरोधीपक्ष नेता, त्यानंतर दोनदा शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेची उमेदवारी मात्र पराभव नक्की वादाचे कारण काय ? पक्षात पदाधिकारी बदलताना विचारात घेतले नसल्याचा आरोप मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सुधाकर बडगुजर यांना टाळून अन्य पदाधिकारी आमंत्रित, मातोश्रीवर झालेल्या दुसऱ्या बैठकित आपल्याला टाळल्याची खदखद 

बडगुजर यांचा भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेचत प्रवेश खडतर…. मुख्य म्हणजे भाजप नेत्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा माणूस असलेल्या सलीम कुत्तासमवेत बडगुजर यांच्या पार्टीचे फोटोही  शेअर करण्यात आले होते. यावर आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. असून आपल्यावरील आरोप आणि गुन्हे झाकण्यासाठी कुणाला भाजपमध्ये यावे वाटत असेल तर ते चालणार नाही, असेही हिरे यांनी म्हटले आहे.ज्यांच्यावर १७ गुन्हे दाखल आहेत, ज्यांचे संबंध दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत आहेत अशा बडगुजर यांना पक्षात घेऊ नये अशी मागणी सीमा हिरे यांनी केली  तर दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनी देखील सुधाकर बडगुजर यांचा शिवसेनेत अथवा महायुतीतील पक्षात येण्यास विरोध केला असून कुंभमेळा लक्षात घेऊन ठेकेदारी मिळविण्यासाठीच बडगुजर यांना सत्तेत सहभाग हवा असल्याचा आरोप तिदमे यांनी केला आहे

Loading

Previous Post

जादूटोण्याचा संशय आणि विटांनी ठेचून खून

Next Post

‘शिंदे’ मातोश्रीवर गेलेच नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White