नाशिक जिल्ह्यात पाच दिवस यलो अलर्ट

नाशिक : राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर कायम असून पुढील 36 तासांसाठी राज्याच्या विविध भागांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात पाच दिवस “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 24 ते 25 मे रोजी पूर्व मध्य अरबी समुद्रावर आणि कोकण गोवा आणि लगतच्या दक्षिण गुजरात किनाऱ्यावर 45-55 किमी प्रतितास ते 65 किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात देखील वारा त्याचबरोबर मुसधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे.

![]()















