अनेक ठिकाणी वाहनांवर झाडे कोसळण्याच्या घटना

नाशिक : सलग चौथ्या दिवशी देखील शहरात पावसाने तांडव केला असून त्याचबरोबर सोसाट्याचा वारा सुटल्याने पुन्हा अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तत्र्यंबक रोडवर फॉरेस्ट सिग्नल जवळपास दुपारच्या सुमारास वाहने थांबलेली असताना रस्त्याच्या बाजूला असलेले बुचाचे भले-मोठे झाड कोसळल्याने त्या खाली दोन मोटारींसह एक रिक्षा दाबली गेली. सुदैवाने रिक्षाचालक व त्यामध्ये असलेली महिला प्रवासी व दोन्ही कारचे चालक थोडक्यात वाचले. परिसरातील नागरिकांनी त्यांना वाहनातून बाहेर काढले .यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहचत वाहनांवर पडलेल्या झाडांचे खोड, फांद्या कटरने कापत बाजूला केल्या. यादरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जेलरोड भागातील दसक पुलाजवळ अचानकपणे रस्त्याच्या कडेला असलेले गुलमोहराचे झाड चालत्या कारवर कोसल्याची घटना घडली सुदैवानं कार मधील प्रवाशी बचावले

झाड कोसळून दोघांचा मृत्यू सातपूर परिसरातील एका कंपनीत नोकरीला जाण्यासाठी दुपारच्या सुमारास दोघे मित्र गौरव रिपोटे (वय 21) सम्यक भोसले (वय 20) दोघेही राहणार देवळाली गाव, हे दोघे जिवलग मित्र रस्त्याने प्रवास करत असताना वादळवारा व पावसामुळे ठिसूळ जातीचा भला मोठा गुलमोहराचा वृक्ष त्यांच्या दुचाकीवर पडला यामुळे ते दोघेही झाडाच्या फांद्यांखाली दाबले गेले. यादरम्यान दोघांचा मृत्यू झाला यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात पावसाचा फटका जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत


![]()














